शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलाची दिवाळीत तत्परता

By admin | Updated: November 4, 2016 01:34 IST

एकीकडे शहरात नागरिक रॉकेट बॉम्ब, फॅन्सी फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत होते.

नेहरुनगर : एकीकडे शहरात नागरिक रॉकेट बॉम्ब, फॅन्सी फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत होते. दुसरीकडे अग्निशामक दलाचे जवान जिवाची बाजी लावत फटाक्यामुळे लागलेली आग विझवीत आपले कर्तव्य चोखपणे बजावीत होते. दिवाळीच्या पाच दिवसांत पिंपरी*चिंचवड शहरात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या २८ घटना घडल्या आहेत.शहरात चिखली, पिंपरी , नेहरुनगर, चिंचवड, निगडी, सांगवी, कासारवाडी, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, बोपखेल इत्यादी भागात रॉकेट, फॅन्सी फटाके आकाशात फुटल्यानंतर त्यांचा अर्धवट जळालेला भाग दुकान, गोदाम आदी ठिकाणी पडल्यामुळे त्या वस्तूंनी पेट घेतल्यामुळे प्रामुख्याने या सर्व ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील या आगीच्या घटनांमध्ये आग विझवण्यासाठी दलाला १०० गाड्या लागल्या असून, त्यामधील अंदाजे पाच लाख लिटर पाण्याची गरज भासली. आग विझवण्यासाठी शहरातील पाच अग्निशामक केंद्रांच्या बंबाबरोबर पुणे महापालिका व चाकण एमआयडीसी अग्निशामक केंद्र, तसेच काही खासगी कंपन्यांच्या बंबांची मदत घ्यावी लागली. शहरातील सर्वात मोठी आग चिखली येथील एका गोदामाला लागली होती. ती विझवण्यासाठी दलाला मोठी कसरत करावी लागली. या सर्व ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांत आपला जीव धोक्यात घालून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांनी केले. परंतु या आगीच्या घटनांमध्ये अग्निशामक दलाचे दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या २६ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या दिवाळीच्या सणादरम्यान सर्व साप्ताहिक सुट्या, सर्व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अग्निशामक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संपूर्ण दिवाळी आग विझवण्याच्या घटनांमध्ये गेली. (वार्ताहर)>फॅन्सी फटाके, रॉकेट उडवल्यामुळे फटाके आकाशात फुटल्यानंतर त्याचा अर्धवट जळालेला भाग दुकान, गोदाम आदी ठिकाणी पडल्यामुळे त्या वस्तूंनी पेट घेतला. या प्रामुख्याने या सर्व ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा फटाक्यांवर निर्बंध आणल्यास दिवाळी दरम्यान आगीच्या घटना कमी होतील, असे संत तुकारामनगर येथील मुख्य अग्निशामक केंद्राचे अग्निशामक अधिकारी उदय वानखेडे यांनी सांगितले.