शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात अग्नितांडव 16 शहीद 19 गंभीर

By admin | Updated: June 1, 2016 04:53 IST

आशिया खंडातील सर्वात मोठे समजले जाणारे पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प) सात हजार एकरात पसरले असून, अल्फा, ब्रेव्हो, चार्ली आणि डेल्टा अशा चार सब डेपोत त्याचा विस्तार आहे.

नरेश डोंगरे / राजेश भोजेकर/ प्रभाकर शाहाकार , पुलगाव (जि. वर्धा) आशिया खंडातील सर्वात मोठे समजले जाणारे पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प) सात हजार एकरात पसरले असून, अल्फा, ब्रेव्हो, चार्ली आणि डेल्टा अशा चार सब डेपोत त्याचा विस्तार आहे. सीएडी कॅम्पचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेला पुलगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत असून, डेल्टा सब डेपोची सीमा दक्षिण दिशेला आगरगावपासून ५०० मीटर अंतरावर आहे. बाजूला पिपरी (खराबे) गेट (चौकी) आहे. हे कोठार नागपूरपासून ११२ किमी, तर वर्धा जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. या भांडारात चांदा आयुध निर्माणी आणि बोलंगीर येथे निर्मित दारूगोळा साठविण्यात येतो.....तर मोठा अनर्थ घडला असताआगीने कॅम्पला विळखा घातल्याचे लक्षात येताच, सीएडीच्या अधिकाऱ्यांनी खंदकात सुरक्षित ठेवलेल्या बॉम्बपर्यंत आगीची तीव्रता पोहोचू नये, म्हणून चक्क मृत्यूशी सामना केला. सीएडीचे दोन अग्निशमन दल तातडीने आग विझविण्यासाठी धावले. आगीने दोन किलोमीटरचे क्षेत्रफळ कवेत घेतले होते. खंदकातील बॉम्बला झळ लागल्यास संपूर्ण देवळी तालुक्यातील शेकडो लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, ही कल्पना आल्यामुळे लेफ्टनंट कर्नल रंजित पवार आणि मेजर बी. मनोजकुमार आपल्या सहकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांना घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करू लागले. अचानक बॉम्बचा स्फोट झाला. त्याची तीव्रता एवढी होती की, स्फोटामुळे अग्निशमन दलाची दोन्ही वाहने फुटबॉलसारखी हवेत उंच उडाली. यात सैन्य दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जण शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी झाले. अशाही स्थितीत उपरोक्त अधिकारी आणि जवानांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ६ तास आगीशी झुंज देत, मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान नियंत्रण मिळविले. सर्व जखमींना सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भारतीय लष्कराच्या पुलगाव (जि. वर्धा) येथील दारूगोळा भांडारात आग लागून झालेल्या भीषण स्फोटांत सैन्य दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जण शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी आहेत. सोमवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे स्फोट इतके भीषण होते की, पंचक्रोशीतील अनेक गावांमधील घरे हादरली. त्यामुळे लोक गाव सोडून सैरावैरा धावत सुटले.सहवेदना... पाच दिवसांच्या मोरोक्को, ट्युनिशिया दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीदेखील पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारातील घटनेतील जवानांच्या मृत्यूवर अतीव दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी, तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.लष्कराला धक्का...या घटनेने सेना प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे. एवढ्या मोठ्या संख्येत सीएडीतील अधिकारी आणि जवान शहीद झाल्याचे कळल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लष्करप्रमुख मेजर जनरल दलबीरसिंग यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले, तसेच मंगळवारी दुपारी पर्रिकर यांनी सीएडी कॅम्प गाठले. कोर्ट आॅफ इन्क्वायरीचे आदेश... पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात आग नेमकी कशामुळे लागली, घातपात तर झाला नाही ना आदी विविध कारणांचा शोध घेण्यासाठी सैन्य दलाने कोर्ट आॅफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. शिवाय विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली असून, ही समिती घटनेतील बारकावे शोधून, अहवाल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे सादर करणार आहे.शहीद : स्फोटात कर्नल पवार, मेजर मनोजकुमार, तसेच अग्निशमन दलाचे बाळू पाखरे, अमित दांडेकर, किसनकुमार, बी.के. यादव, नवज्योतसिंग, अमोल येसनकर, चोपडे, अमित पुनिया यांच्यासह १६ जण कर्तव्यावर शहीद झाले आहेत.जखमी : प्रदीपकुमार मुन्शीरान, राजेंद्र महाजन, नेत्रपाल रनसिंग, संतोष पाटील, शाज कुमार, सतीश गोवावकर, दीपक शिंदे, राम नामदेवराव वनकर, ललित कुमार, बच्चन सिंग, गजेंद्र सिंग, शिवेंद्र त्रिपाठी, जगदीश चंद्र, स्वप्निल रमेश खुरगे, लोकेश, शरद यादव, के.एम. साहू, बाबाराव महादेव आणि उमाकांत प्रदीप आदी गंभीर जखमी झाले आहेत..