शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर शहीद

By admin | Updated: May 25, 2015 04:18 IST

काळबादेवी येथील गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे अखेर रविवारी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये निधन झाले.

मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे अखेर रविवारी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये निधन झाले. नेसरीकर यांच्या निधनाने अग्निशमन दलाने आणखी एक मोहरा गमावला असून, यापूर्वी याच दुर्घटनेतील अग्निशमन दलाचे अधिकारी संजय राणे, महेंद्र देसाई आणि सुधीर अमीन यांनाही प्राण गमवावे लागले होते.९ मे रोजी गोकूळ हाऊस इमारतीला लागलेल्या आगीत सुनील नेसरीकर हे पन्नास टक्के भाजले होते. ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. संसर्गाचा धोका टळावा म्हणून तातडीने त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर पायावर त्वचारोपण करण्याची शस्त्रक्रियाही पार पडली होती. या उपचारादरम्यान नेसरीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नॅशनल बर्न सेंटरने प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व शस्त्रक्रिया निष्फळ ठरल्या. एकापाठोपाठ एक सर्वच अवयव निकामी होत गेल्याने अखेर रविवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे सेंटरने स्पष्ट केले आहे.सोमवारी सकाळी १० वाजता भायखळा येथील अग्निशमन दल मुख्यालयाच्या प्रांगणात सुनील नेसरीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. या वेळी त्यांना मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर दुपारी १२ वाजता चंदनवाडी वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान, नेसरीकर यांच्या पश्चात आई, पत्नी जयश्री आणि मुलगा सिद्धांत असे कुटुंब आहे. (प्रतिनिधी)फायर फायटर हरपला!सुनील नेसरीकर यांची फायर फायटर अशी ओळख होती. गतवर्षी अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीत जवान नितीन इवलेकर यांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जवान अडकले होते. तेव्हा अग्निशमन दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी आदेश वर्मा यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर सुनील नेसरीकर यांच्यावर कार्यभार सोपविण्यात आला होता. नेसरीकर हे स्वत: एक उत्तम फायर फायटर होते. आग विझविण्यासाठी ते स्वत: आघाडीवर असत, अशी त्यांची ख्याती होती. एक जिगरबाज आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती.