शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल, वकिलासह कुटुंबीयांवर घातला बहिष्कार; फिर्याद दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:24 IST

पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे.

पुणे : पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. कमिटीच्या पंचांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून सक्तीचे संरक्षण (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६च्या कलम ३८८ (१५) ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सोमनाथ केंची (रा. गुरुवार पेठ), महादेव काडगी (धनकवडी), दिलीप जाना (कोंढवा बुद्रुक), विनायक साका (३०१, महात्मा फुले पेठ), विनोद जालगी (धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सचिन नरेंद्र दासा (वय ३७, रा. २९६, काशितारा निवास, महात्मा फुले पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.या जागेत दासा यांचे पणजोबा नारायण चन्नप्पा दासा हे भाडेकरू होते. ही जागा त्यांच्या मृत्यूनंतर आजोबा काशिनाथ नारायण दासा यांच्या ताब्यात आली. काशिनाथ यांनी जागेची भाडेपावती वडील नरेंद्र यांच्या नावाने करण्यासाठी संस्थेला लेखी अर्ज दिले होते. काशिनाथ यांच्या मृत्यूनंतर भाडेपावती नरेंद्र यांच्या नावे केली नाही. त्याचे भाडेही दासा कुटुंबीय देत आहेत. वडील नरेंद्र यांच्या मृत्यूनंतर भाडे पावती स्वत:च्या नावाने करण्यासाठी सचिन यांनी अर्ज दिले. पदाधिकाºयांकडे विचारणा केली असता विद्यमान सरपंच सोमनाथ केंद्री यांनी भाडे पावती नावावर करण्यासाठी पाच लाख रुपये तसेच भाड्याचे १५ हजार वेगळे द्यावे लागतील, असे सांगितले. समजाबाहेरील सदस्यांनाही भाडेकरू म्हणून ठेवल्याचे व त्यांना भाडेपावती दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. २०१६मध्ये कमिटी आणि दासा कुटुंबीयांची बैठक झाली. त्याही वेळी पैशांची मागणी करण्यात आली. ७ एप्रिल २०१७ रोजी अ‍ॅड. आनंद दासा यांनी केंची यांना फोन केला असता त्यांना शिवीगाळ केली. याबाबत मीठ गंज पोलीस चौकीमध्ये तक्रार केल्यावर केंची यांना समज देऊन प्रकरण मिटवले होते. २६ एप्रिल रोजी संस्थेने घेतलेल्या बैठकीमध्ये आनंद यांना दिलीप जाना यांनी ‘तुम्हाला माज आला आहे. आताच जागा रिकामी करायला लावतो,’ असे म्हणून विश्वस्त काडगी यांना फोन केला. काडगी यांनीही त्यांना ‘तुमच्या बापाने आणि आजोबांनी समाजात खूप नाटके केली आहेत. आम्ही सांगितलेली रक्कम द्या, नाहीतर तुम्हाला मिळकतीमधून बेदखल करून समजातून वाळीत टाकू. दासा कुटुंबातील एकाच्या जिवाचे तरी बरेवाईट करू’ अशी धमकी दिली.>भाडेकराराने जागा दिली होतीसचिन दासा हे आई शकुंतला, पत्नी आरती, भाऊ अ‍ॅड. आनंद, भावजय पद्मप्रिया आणि मुलांसह राहण्यास आहेत. त्यांचे सुरेंद्र जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. पद्मशाली पंच कमिटी ही समाजाची विश्वस्त संस्था असून या कमिटीच्या मालकीच्या जागा आहेत. त्यापैकी महात्मा फुले पेठेतील समाजातील गरजूंना व्यवसायासाठी संस्थेने भाडेकराराने कायमस्वरूपी जागा दिलेली होती. त्यापोटी आकारले जाणारे भाडे विश्वस्तांना दिले जाते.>फिर्यादी यांच्याकडून पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी, काही जणांचे जबाब याची खातरजमा केल्यानंतर पद्मशाली पंच कमिटीच्या पदाधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.- राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ निरीक्षक,खडक पोलीस ठाणे