शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आठ पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवा

By admin | Updated: February 16, 2016 03:43 IST

संदीप गदोली चकमक प्रकरणी गुडगावच्या आठ पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला.

मुंबई : संदीप गदोली चकमक प्रकरणी गुडगावच्या आठ पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सोपविला.गुडगावच्या संदीप गदोली याचा भाऊ कुलदीप याने गुडगाव पोलिसांनी बनावट चकमक दाखवून भावाची हत्या केल्याचा आरोप याचिकेद्वारे केला आहे. गुडगाववरून मुंबईत आलेल्या आठही पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात यावा व त्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुलदीप गदोली यांनी याचिकेद्वारे केली आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने संदीपच्या हत्येसाठी गुडगाव पोलिसांना पाच कोटी रुपयांची सुपारी दिली. अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेल एअरपोर्ट मेट्रोमध्ये ७ फेब्रुवारी रोजी त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्याला शरण येण्याची संधीच दिली नाही. तसेच स्थानिक पोलिसांना त्याची कल्पनाही दिली नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.खंडपीठाने मुंबई पोलिसांना याचिकाकर्त्याची तक्रार नोंदवून आठ पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला. दोन परस्परविरोधी एफआयआरवर एसआयटी तपास करू शकते, असे म्हणत खंडपीठाने आठ पोलिसांविरुद्ध सोमवारी एफआयआर नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला. (प्रतिनिधी)