शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

एका मिनिटात शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन

By admin | Updated: January 18, 2017 12:34 IST

जर तुमचा स्मार्टफोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय तर निराश होऊ नका. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन तुम्ही चक्क एका मिनिटात शोधू शकाल.

तुषार भामरे 

मुंबई, दि. 18 - जर तुमचा स्मार्टफोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय तर निराश होऊ नका. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन तुम्ही चक्क एका मिनिटात शोधू शकाल. गुगलने असं एक फिचर दिलंय ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन हरवल्यावर तो शोधणं अगदी सहज शक्य आहे.पहिली स्टेप:सर्वात आधी इतर स्मार्टफोन अथवा कंप्युटरवरून तुमचं जी-मेल अकाउंट साईन इन करा. तुमच्या स्मार्टफोनमधेजे अकाउंट तुम्ही वापरत होतात त्याच अकाउंटवरून साईन इन करणं गरजेचं आहे.

(गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स)दुसरी स्टेप: यानंतर गुगलच्या होमपेजवर जाऊन ‘Find my phone’ असं टाईप करा. समोर आलेल्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनची यादी समोर येईल ज्यात तुम्ही आधी वापरलेल्या स्मार्ट्फोनची नावंही असतील. आता या यादीतून तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनच्या नावावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर गुगल मॅप/नकाशा उघडेल.

तिसरी स्टेप: या मॅपमध्ये तुम्हाला तुमच्या फोनची लोकेशन दिसेल. गुगल तुमच्या स्मार्टफोनच्या लोकेशनला ट्रेस करेल आणि तुम्हाला तो कुठे आहे त्याची माहिती दाखवेल. तुम्ही कुठून प्रवास करून आला असाल आणि तुम्ही फोन नक्की कुठे हरवलाय त्यासाठी हे फिचर खुपच उपयुक्त आहे. तुम्हाला फोनची लोकेशन कळाल्यावर त्याला योग्य स्थळी जाऊन तुम्ही शोधू शकाल.इतर महत्त्वाचे पर्याय:जर तुम्ही फोन घरीच विसरून आला आहात किंवा इतर ठिकाणी कुठे फोन गहाळ झाला असेल तर त्याला तुम्ही फुल वॉल्यूमवर रिंग करू शकता.

तुमचा फोन सायलेंटवर असेल तरी तो फुल वॉल्यूमवर वाजेल. फक्त अशावेळी त्याची बॅटरी संपलेली असायला नको. फोन रिंग करण्याचा पर्याय तुम्हाला मॅपच्या तळबाजूला दिसेल. जर तुम्हाला तुमचा फोन चुकीच्या हाती गेलाय असं वाटत असेल तर फोनला लॉक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमच्या फोनमधला सर्व डेटा डिलीट करायचा असेल तर याचा पर्यायही इथे उपलब्ध आहे. तुमच्या फोनमधला सर्व डेटा यामुळे डिलीट होईल.

लक्षात ठेवा: या सगळ्या ट्रिक्स तेव्हाच काम करतील जेव्हा तुमचा मोबाईल डेटा ऑन असेल किंवा तुमचा मोबाईल इतर मार्गाने इंटरनेटशी कनेक्टेड असेल.

(tusharbhamre@gmail.com)