शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नेमके काय चुकले याचा शोध घ्या

By admin | Updated: March 2, 2017 01:52 IST

गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत.

रहाटणी : कोणी म्हणते, मतदान यंत्रात काही तरी गडबड केलेली असावी, तर कोणी मोदी लाट अद्याप संपली नाही असे म्हणू लागले आहेत. कोणी नवमतदारांचा वाढलेला मतांचा टक्का भाजपाच्या पथ्यावर पडला आहे, असा निष्कर्ष काढू लागले आहेत. तर कोणाच्या मते महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवास गाफीलपणा नडला. महापालिकेतील सत्तांतराची अशी कारणमीमांसा होत असताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नेमके काय चुकले, याचा शोध घ्यावा अशी जाणीव मतदारांनीच निवडणुकीनंतर ठिकठिकाणी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दिली आहे. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाचे ८१ नगरसेवक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीला संलग्न असलेले ११ अपक्ष नगरसेवक होते. बहुमताच्या जोरावर १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासकामांचा डोंगर उभा केला होता. याच विकासकामांचे भांडवल निवडणुकीत कामी येईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. असे असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत केवळ ३६ जागा मिळाल्या; तर अवघे ३ नगरसेवक असे पक्षीय बल असलेल्या भाजपाने या निवडणुकीत महापालिकेत तब्बल ७७ नगरसेवक निवडून आणले. शहरातील नागरिकांनी मताचा कौल भाजपाच्या बाजूने का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>कट्टर विरोधकांनी घेतली एकमेकांची गळाभेटलोकसभा, विधानसभा आणि नुकतीच झालेली महापालिका निवडणूक अशा प्रत्येक टप्प्यावर शहरवासीयांनी येथील राजकारण जवळून पाहिले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी ऐनवेळी एकत्र येतात. स्वार्थासाठी पक्षनिष्ठा, विचारधारा या तत्त्वांना तिलांजली दिली जाते. वर्षानुवर्षाचे कट्टर विरोधक असलेले एकमेकांची गळाभेट घेतात. बंडखोरांनाही सन्मान मिळतो. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना आला आहे. कोलांटउड्या कोणी, कशा मारायच्या त्या मारू द्यात, सर्वजण ज्या ठिकाणी एकत्र येतील,त्याकडे मतदारांनी लक्ष केंद्रित केले.>राजकीय चर्चेला अर्थ नाहीऐनवेळी पक्षांतर करणारे, एकमेकांवर आरोप करणारे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात फरक काहीच नाही, हे मतदारांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मतांचा कौल दिला. हे लक्षात घेतले, तर बाकी राजकीय चर्चेला काही अर्थच नाही, असा निष्कर्ष काही जाणकारांच्या चर्चेतून निघाला आहे.