शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘कारागृहासाठी तातडीने जागा शोधा’

By admin | Updated: March 2, 2017 05:39 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे व अन्य कारणांमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.

मुंबई : वाढत्या लोकसंख्येमुळे व अन्य कारणांमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्यामानाने अस्तित्वात असलेल्या कारागृहांची क्षमता अत्यंत कमी आहे. सध्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट आरोपी व कैदी ठेवण्यात आले आहेत. हीच स्थिती पुण्याच्या येरवडा कारागृहाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई व पुण्यात अतिरिक्त कारागृह बांधण्यासाठी येत्या तीन महिन्यात सरकारी भूखंड शोधावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.जनआंदोलन या एनजीओने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्यातर्फे उच्च न्यायालयात येरवडा कारागृहासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने निकाल दिला.शहरात कारागृह नसणे ही स्थिती अगदी आदर्श स्थिती आहे पण आपण एवढ्या आदर्शवादी जगात राहात नाही. वाढती लोकसंख्या आणि अन्य बाबींमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या शहरांतील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी भरण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पुढील २५-३० वर्षांचा विचार करून या दोन्ही शहरांत अतिरिक्त कारागृहे बांधण्यासाठी सरकारी जागा शोधणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले. सध्या नवीन कारागृहे उपलब्ध करणे शक्य नसल्याने उच्च न्यायालयाने तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या कारागृहांमध्ये वाढीव बांधकाम करणे शक्य आहे का? याचीही चाचपणी करण्यास सांगितले आहे. राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी काही एनजीओ व आहारतज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देशही सरकारला दिले. (प्रतिनिधी)