शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

By admin | Updated: May 6, 2014 16:32 IST

औरंगाबाद, दि.६ - तरुण वयातच नोकरदार वर्गाने निवृत्तीनंतरचे नियोजन करायला हवे. भांडवल बाजार विकसित झाल्यानंतर मग निवृत्तीनंतरचे नियोजन करण्यासाठी नवनवीन साधने उपलब्ध होऊ लागली. सुरुवातीच्या काळात तर अशा प्रकारची कुठलीच साधने नव्हती. भविष्य निर्वाह निधी, बचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक निवृत्तीसाठी नियोजन करण्याचा चांगला विचार होता. सुरुवातीच्या काळात नियोजनाची आवश्यकता नव्हती. कारण एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, ही पद्धती चांगली की वाईट, यावर अनेक वाद-विवाद होऊ शकतील; परंतु या पद्धतीत आपोआपच घरातले मिळवते आणि निवृत्त झालेले या दोघांनाही एकमेकांचा आधार घेता येत होता.

औरंगाबाद, दि.६ - तरुण वयातच नोकरदार वर्गाने निवृत्तीनंतरचे नियोजन करायला हवे. भांडवल बाजार विकसित झाल्यानंतर मग निवृत्तीनंतरचे नियोजन करण्यासाठी नवनवीन साधने उपलब्ध होऊ लागली. सुरुवातीच्या काळात तर अशा प्रकारची कुठलीच साधने नव्हती. भविष्य निर्वाह निधी, बचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक निवृत्तीसाठी नियोजन करण्याचा चांगला विचार होता. सुरुवातीच्या काळात नियोजनाची आवश्यकता नव्हती. कारण एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, ही पद्धती चांगली की वाईट, यावर अनेक वाद-विवाद होऊ शकतील; परंतु या पद्धतीत आपोआपच घरातले मिळवते आणि निवृत्त झालेले या दोघांनाही एकमेकांचा आधार घेता येत होता. यानंतरची एक पिढी अशी आली की, ज्या पिढीला आपल्या आई-वडिलांची जबाबदारी उचलावी लागली आणि निवृत्तीनंतर काय हे प्रश्न सोडवण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी लागली आणि आता तर मुले परदेशात गेलेली. निवृत्त व्यक्तींना आराम करता यावा, अशी सोय नाही. कारण मुले परदेशात निघून गेली आणि त्यांनी आई-वडिलांच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावरून फेकून दिले.गुंतवणुकीचे प्रॉडक्ट्स मात्र फारसे बदलले नाहीत. विमा कंपन्यांचे पेन्शन प्लॅन, बँकांच्या ठेवी, पोस्ट ऑफिस या पलीकडे जाऊन निवृत्तीसाठी नियोजन हा शब्द उशिरा रुळला. खासगी नोकर्‍यांमध्ये पेन्शनची सोय नाही म्हणून कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स गोळा करणे अशा प्रकारे शेअर्स सांभाळायचा ज्यांनी उद्योग केला ते यशस्वी झाले़ गुंतवणूकदारांच्या तुलनेने मिळालेले शेअर्स त्यानंतर हक्काच्या शेअर्सची विक्री अशा प्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक करून निवृत्तीचे नियोजन करणारे गुंतवणूकदार मिळतात; परंतु भविष्यात अनिश्चितता असते, यामुळे शेअर्सकडे जाण्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून निवृत्तीचे नियोजन हा प्रकार गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचला. युटीआय रिटायरमेंट बेनिफिट पेन्शन आणि टेंपलटन म्युच्युअल फंडाची योजना उपलब्ध याच दोन योजनांच्या साहाय्याने निवृत्तीचे नियोजन करायला हवे असे नाही. तरुण वयात जोखीम स्वीकारण्याची ताकद दाखवली तरीसुद्धा इक्विटी योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे नियोजन चांगले होऊ शकते.