शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वित्तीय संस्थेस आठ लाखांचा गंडा

By admin | Updated: July 14, 2017 01:36 IST

८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन वित्तीय संस्थेस गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ ठगांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : जुन्या इनोव्हा कारची खरेदी करावयाची असे भासवून त्या गाडीची परिवहन विभागाची बनावट कागदपत्रे तयार करून, एका खासगी वित्तीय संस्थेकडून त्याआधारे ८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन वित्तीय संस्थेस गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ ठगांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणी उरुळी कांचन (ता. हवेली) आश्रमरोड येथील श्रीराम फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र जयशंकर तिवारी (वय ४१, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण भगवान भोंडवे (रा. मांजरी बुद्रुक), प्रकाश दत्तात्रय ससाणे (रा. हडपसर, पुणे २८), स्वप्निल रामदास चौघुले (रा. सासवड, ता. पुरंदर), रवींद्र गायकवाड व दत्तात्रय पवार (रा. बारामती) या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : सदर प्रकार १ मे २०१६ ते १२ जुलै २०१७ या कालावधीत घडला आहे. इनोव्हा कार (एमएच १२ यूडब्यू) ही जुनी गाडी खरेदी करण्यासाठी किरण भोंडवे याने श्रीराम फायनान्स कंपनी शाखा उरुळी कांचन या खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेकडे ८ लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी लागणारी परिवहन विभागाची सर्टिफिकेट, वाहन चालवण्याची सशुल्क पावती, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सर्टिफिकेट आदी आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पूर्तता त्याने केली होती. त्याचबरोबर दोन जामीनदार यांची कागदपत्रेही दिली होती. सर्व कागदपत्रे पाहून सदर वित्तीय संस्थेने भोंडवे यास ८ लाख रुपयांचे कर्ज ७ हप्त्यांच्या परतफेडीच्या बोलीवर दिले.कर्जाचे काही हप्ते भरले. परंतु, नंतर मात्र पैसे भरण्यास टाळाटाळ होऊ लागली. वित्तीय संस्थेने नियमानुसार कर्ज फेडावे म्हणून कर्जदारासह जामिनदारांना स्मरणपत्रेही पाठवली. तरीही कर्जाच्या रकमेची परतफेड होत नाही हे पाहून संस्थेने वरील सहा जणांविरोधात अर्ज दाखल केला. सदर प्रकरणाच्या चौकशीत परिवहन विभागाची कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगवले हे करत आहेत.