शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

आर्थिक संकटाचे राज्यावर सावट!

By admin | Updated: August 21, 2015 01:27 IST

निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात

संदीप प्रधान , मुंबई निधी किती उपलब्ध आहे, याचा विचार न करता राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून केल्या जात असलेल्या लोकानुनयाच्या घोषणा महाराष्ट्राला आर्थिक संकटाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा राज्याच्याच वित्त खात्याने दिला आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदा मिळालेली सत्ता सोडताना युती सरकारने १९९९मध्ये महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते, याचे स्मरणही वित्त विभागाने फडणवीस सरकारला दिले आहे. टोलमाफी, एलबीटी रद्द करणे, कृषी पंपांची वीज सवलत, अन्नसुरक्षा अशा एक ना अनेक निर्णयांमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत आहे. त्याचवेळी आर्थिक मंदीमुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. बांधकाम व्यवसायात सध्या मंदी असल्याने त्याचाही परिणाम सरकारच्या उत्पन्नावर झाला आहे. अशा परिस्थितीत मागील खेपेस युती सरकार पायउतार झाल्यावर २००० ते २००४ या काळासारख्या आर्थिक संकटाला पुन्हा तोंड द्यावे लागू शकते, याकडे वित्त विभागाने लक्ष वेधले आहे. २००० ते २००४ या काळात आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात सरकारी नोकरभरती बंद केली गेली, हंगामी भरतीवरही निर्बंध घातले गेले, सरकारी खरेदीवर कठोर बंधने लादली गेली होती. त्या चार वर्षांत सरकारने खरेदी थांबवल्याने फर्निचरपासून स्टेशनरीपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा करणारे काही पुरवठादार व्यवसायातून हद्दपार झाले. तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा हा धोक्याचा इशारा आहे.जून महिन्यातील उत्पन्नाची आकडेवारी व कंसात गतवर्षी याच महिन्यातील उत्पन्न- जमीन महसूल ४६ कोटी (११७ कोटी), मुद्रांक व नोंदणी शुल्क १६३ कोटी (४४८ कोटी), राज्य उत्पादन शुल्क ९२८ कोटी (२१९२ कोटी). अशीच परिस्थिती राहिली तर उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणे वित्त विभागाला अशक्य वाटते. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने १४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये दुचाकी वाहनांना दिलेल्या टोलमाफीकरिता ८०० कोटींची तर एलबीटी रद्द करून व्यापारी वर्गाला दिलासा देण्याकरिता २०९८ कोटी रुपयांची मागणी केली होती. सबसिडीचा भार वाढला। सरकार सबसिडीपोटी ७२००ते ७५०० कोटी रुपये खर्च करते. अन्नसुरक्षा, जमीन संपादन यांसारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे राज्य सरकारवरील भार वाढल्याचे वित्त आयोगाकडे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.