शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एशियन बँकेचे रस्त्यांसाठी अर्थसहाय्य

By admin | Updated: October 21, 2016 01:54 IST

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यांत त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युईटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट

- राजेश निस्ताने, यवतमाळ

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यांत त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युईटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) अर्थसहाय्य लाभणार आहे. महाराष्ट्रात रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाच्या तिजोरीत पुरेसा पैसा नाही. टोलला जनता विरोध करते. यावर पर्याय म्हणून ‘अ‍ॅन्युईटी’ योजना आणली. या योजनेत कंत्राटदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय्य मिळेल. यासंबंधी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शासनाने आदेश जारी केले. ‘अ‍ॅन्युईटी’तील एडीबी अर्थसहाय्य योजनेतून राज्यात एकूण ३० कामे मंजूर करण्यात आली. त्यातून तीन हजार ३४ किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. मुख्यमंत्री-गडकरींमध्ये दुमत राज्य मार्ग बांधकामाच्या या योजनेत अमरावती विभागात पहिल्या टप्प्यात ६८५ कोटी रुपये हे नागपूर-मुंबई (मार्गे पुलगाव-देवगाव-शिंगणापूर-कारंजा-सिंदखेडराजा) या रस्त्यावर खर्च होणार आहेत. 274किलोमीटरचे बांधकाम त्यातून होईल. मात्र या कामाच्या निवडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या सुपर एक्सप्रेस-वेमुळे नागपूरहून सहा तासात मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. या मार्गासाठी स्वतंत्र खर्च होणार असताना शिंगणापूर हायवेवर ६८५ कोटींचा खर्च कशासाठी या मुद्यावरून या दोघांमध्ये दुमत झाल्याची बांधकाम सूत्राची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात ९७७ किमी रस्त्याची ११ कामे असून त्यासाठी दोन हजार ५९४ कोटींचे बजेट आहे. दुसऱ्या टप्प्यात एक हजार ८४ किलोमीटरची नऊ कामे असून त्याचे बजेट दोन हजार ८७२ कोटींचे आहे. तिसरा टप्पा हा दोन हजार ९४८ कोटींचा आहे. त्यात दहा कामे घेण्यात आली. त्यातून ९७४ किलोमीटरच्या राज्य मार्गांचे बांधकाम होणार आहे.- सी.व्ही. तुंगे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती