शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागाने अधिकार सोडला!

By admin | Updated: April 25, 2015 04:21 IST

एखादी योजना/प्रकल्पाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली असेल, त्यासाठी तरतूद उपलब्ध असेल आणि खर्च मंजुरीचे अधिकार संबंधित विभागाला असतील,

यदु जोशी, मुंबईएखादी योजना/प्रकल्पाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली असेल, त्यासाठी तरतूद उपलब्ध असेल आणि खर्च मंजुरीचे अधिकार संबंधित विभागाला असतील, तर परत वित्त विभागाची संमती घेण्याची गरज नाही, असा आदेश वित्त विभागाने काढला आहे. आर्थिक निर्णयाच्या विकेंद्रीकरणासाठी हे पाऊल उचलले असले तरी त्यातून मनमानीला मुभा मिळेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.वित्त विभाग आमच्या फायली अडविते, अशी तक्रार वर्षानुवर्षे सगळेच विभाग करीत आले आहेत. अगदी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वित्त विभागाच्या प्रधान सचिवांवर अनेक मंत्र्यांनी तोंडसुख घेतल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या संमतीचा हा अडसर दूर करण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना, पण वित्त विभागाने ती मागणी मान्य करून खर्चाचे अधिकार संबंधित विभागांना बहाल केले. मात्र या अधिकाराचा वापर करताना आर्थिक अनियमितता झाल्यास त्यासाठी संबंधित विभाग जबाबदार राहील, असे बंधन टाकण्यात आले आहे. वित्त विभागाच्या या निर्णयाचे एकीकडे स्वागत केले जात असताना दुसरीकडे यातून आर्थिक मनमानीला मुभा मिळेल, अशी साशंकताही व्यक्त केली जात आहे.