शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘सायन्स एक्स्प्रेस’ला अखेर रायगडमध्ये थांबा

By admin | Updated: July 15, 2017 05:15 IST

केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विज्ञान प्रसाराकरिता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. १६ डब्यांची ही विशेष विज्ञान ट्रेन कोकणात केवळ रत्नागिरी व मुंबई येथे थांबणार होती. परिणामी, रायगडमधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासू या सायन्स एक्स्प्रेसच्या बौद्धिक लाभास वंचित राहाणार होते. ही बाब गुरुवारी लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ई-मेल करून लक्षात आणून दिली. ही ट्रेन रायगडमध्ये एक दिवस थांबविण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’ची ही विनंती मान्य करून मंगळवारी १८ जुलै रोजी सायन्स एक्स्प्रेस रायगडवासीयांकरिता रोहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांचे कार्यालयीन सचिव सुधीर भालेराव यांनी ‘लोकमत’ला फोन करून दिली आहे.सायन्स एक्स्प्रेसचा १८ जुलै रोजीचा संपूर्ण कार्यक्रम लोकमत कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी साकेत मिश्रा यांनी कळविले आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही सायन्स एक्स्प्रेस रत्नागिरी येथे १४ ते १७ जुलै या कालावधीत थांबून थेट मुंबईत १९ ते २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे थांबणार आहे. मात्र आता यात बदल करून ती रायगडमध्ये रोहा रेल्वे स्थानकावर १८ जुलै रोजी थांबणार असल्याने रायगडवासीयांना या सायन्स एक्झिबिशनचा लाभ घेता येणार आहे. सायन्स एक्स्प्रेस पाहण्याकरिता कोणतेही शुल्क नाही. >आॅक्टोबर २००७ मध्ये सुरुवातआॅक्टोबर २००७मध्ये भारत भ्रमणास प्रारंभ केलेल्या या १६ वातानुकूलित डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत १७४६ दिवसांत १ लाख ५६ हजार कि.मी. प्रवास केला आहे. यादरम्यान देशातील ५०७ रेल्वे स्थानकांवर १ कोटी ६८ लाख विज्ञान जिज्ञासू व विद्यार्थ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक दर्शक संख्या लाभलेल्या सायन्स एक्स्प्रेसची लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये १२ वेळा नोंद झाली असल्याची माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.