शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ‘पँथर’ अखेर नरेंद्र मोदी सरकारचा राज्यमंत्री

By admin | Updated: July 6, 2016 02:13 IST

दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे.

नवी दिल्ली : दलित पँथर चळवळीतून जे नेतृत्व उदयाला आले, त्यात रामदास आठवलेंचे नाव सर्वांनाच परिचित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या या पँथर नेत्याचा समावेश झाला आहे. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर आठवलेंच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात आंबेडकर चळवळीतल्या रिपब्लिकन नेत्याचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मंत्रिमंडळात आठवलेंनी कॅबिनेट मंत्रिपदही भूषवले होते. रा.सु.गवई बिहार व केरळचे राज्यपाल होते. मात्र केंद्रात ते मंत्री होऊ शकले नाहीत. आर. डी. भंडारे राज्यपाल होते. विश्वनाथ प्रतापसिंगांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा सदस्यत्व दिले. काँग्रेसच्या सहकार्याने ते लोकसभेवरही निवडून आले. मात्र केंद्रात त्यांना संधी मिळाली नाही. मोदी सरकारने आठवलेंना मंत्री केल्याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र सदनात बौद्ध भिख्खू व आठवलेसमर्थकांची गर्दी होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा वेध घेत आठवले यांनी भाजपशी घरोबा केला. जातीयवादी, मनुवादी म्हणून ज्यांच्याविरोधात लढाई केली त्यांच्याच मांडवात जाऊन आठवले यांनी जाणे अनेकांना रुचले नव्हते. पण आठवलेंना वाऱ्याची दिशा कळली होती. मोदी लाटेत महायुतीचे चांगभले झाले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले. बक्षिसी म्हणून आठवलेंच्या गळ्यात खासदारकी पडली. आणि दोन वर्षात आठवले मंत्री झाले! राज्यमंत्रिपदाची शपथ घेताना आठवले इतके भावनाविवश झाले की त्यामुळे ते अडखळत होते. ते स्वत:चे नाव घ्यायलाही विसरले. राष्ट्रपतींनी त्यांना आठवण करून दिल्यानंतर मात्र आठवले सावरले. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही आठवले म्हणाले, ज्या पक्षाचे मी प्रतिनिधित्व करतो, त्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. डॉ. आंबेडकरांमुळेच हे मंत्रिपद माझ्या वाट्याला आले आहे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण मंत्रिपरिषदेत मंत्री आहोत. भाजपमध्ये माझ्या पक्षाचे कधीही विलिनीकरण होणार नाही. तसा आग्रह कोणी केला तर मी मंत्रिपदाचा राजीनामाच देईन. माझ्या विभागाचे काम मी निष्ठेने करीन. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हे माझे स्वप्न आहे. त्याचे अध्यक्षपद भूषवण्याच्या स्पर्धेत मी नाही. ‘संविधान’ सार्थकआठवले यांनी आपल्या मुंबईतील घराला ‘संविधान’ असे समर्पक नाव दिले आहे. यावर ते एकदा म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले म्हणूनच माझ्यासारख्या फाटक्या माणसाचं घर झालं! कपड्यांचा शौकरामदास आठवले यांना रंगबेरंगी कपड्यांचा भारी शौक. तेच त्यांचं फॅशन स्टेटमेन्ट बनलं आहे. माणसांनी आपल्या स्वभावासारखे कपडे घालावेत, उगीच सुटाबुटात राहून स्वत:ला जंटलमन भासवू नये. माझा स्वभाव मोकळाढाकळा आहे. त्यामुळे तसेच कपडे घालतो, असं आठवले म्हणतात.