शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जलदूत एक्स्प्रेसला अखेर निरोप!

By admin | Updated: August 9, 2016 03:49 IST

लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे

मिरज : लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेने तब्बल १११ दिवस २६ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचा जगातील पहिलाच प्रसंग आहे. याची लिम्का बुकात नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले.मजुरापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे रेल्वचा पाणी पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. यापुढेही सण, उत्सव साजरे करताना, आपत्तीला तोंड देताना अशीच एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केली. ही संकल्पना मांडणारे भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य मकरंद देशपांडे म्हणाले की, मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्याने पाणीपुरवठा शक्य झाला. यामुळे मिरजेचा लौकिक वाढला आहे, असे आ. खाडे यांनी सांगितले.याप्रसंगी रेल्वे यांत्रिकी अभियंता प्रमोदकुमार, स्थानक अधीक्षक बुध्ददेव भगत, विनोद कुलकर्णी, गाडीचे चालक व्ही. एल. घटकरी, गार्ड बी. डी. सोनवणे, सहाय्यक चालक एन. व्ही. उरकुडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. सादलगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. रेल्वेचालक व्ही. एल. घटकरी यांनी समारोपाच्या फेरीचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी) १११ फेऱ्या...२६ कोटी लिटर पाणीवाघिण्यांमध्ये पाणी भरण्यासाठी मिरजेत रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत दोन किलोमिटर जलवाहिनी बसविण्यात आली. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या सहाय्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणाऱ्या जलदुत एक्स्प्रेसने १११ फेऱ्यांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचविले आहे. जून व जुलैमधील भर पावसाळ्यातही लातूरला पाणी टंचाई असल्याने ‘जलदूत’ला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात लातूर परिसरात पाऊस झाल्याने अखेर ८ आॅगस्टपासून बंद करण्याचा निर्णय झाला.