शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एक्स्प्रेस वेवर २२,२३ जूनला ब्लॉक

By admin | Updated: June 19, 2016 02:21 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पूल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी मागील आठवड्यात महामार्ग पोलिसांची परवानगी

लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पूल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी मागील आठवड्यात महामार्ग पोलिसांची परवानगी न मिळाल्याने लांबणीवर पडलेले काम बुधवारी (दि. २२) व गुरुवारी (दि. २३) करण्यात येणार आहे. दोन्ही दिवशी दुपारी १२ ते ४ दरम्यान प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी हे ब्लॉक घेण्यास परवानगी दिली आहे. महामार्गावरील बोरघाट व खंडाळा टँबचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून वाहतुकीचे नियोजन करत हे काम करावे, असे परवानगीपत्रात म्हटले आहे. द्रुतगती मार्गावर या कामामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरून प्रवास करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. (वार्ताहर)