शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एकनाथ खडसेंविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: April 11, 2017 04:51 IST

भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी

पुणे : भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी तसेच जमीन विकणारे उकानी यांच्याविरुद्ध अखेर सोमवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. जमीन खरेदी केलीच नाही, असे घूमजाव करणाऱ्या खडसे यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोसरी येथील सर्व्हे नं ५२ मधील तीन एकर जागा अब्बास उकानी आणि हसनैन झोएब उकानी (रा. कोलकता पश्चिम बंगाल) यांच्या मालकीची आहे. उकानी यांची जमीन चाळीस वर्षांपूर्वी एमआयडीसीकडून संपादित करण्यात आली होती. ही जमीन परत मिळावी यासाठी उकानी यांनी ८ सप्टेंबर २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उकानी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर उकानी यांची ही जमीन खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्यूटी म्हणून १ कोटी ३७ लाख रूपये भरण्यात आले.या जमीन व्यवहार प्रकरणात खडसे यांनी पदाचा गैरवापर केला. त्यामुळे खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रार अर्ज पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी काही महिन्यांपूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिला होता. तर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आला. तसेच, न्या. झोटींग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश ८ मार्च २०१७ रोजी दिला एसीबीला होता. मात्र, तरीही बंडगार्डन पोलीसांनी खडसे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी व उकानी यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), (१५) आणि भादंवि १०९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस तपास करत आहेत.