शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बेस्टचा पगार मंगळवारी

By admin | Updated: March 19, 2017 03:34 IST

मार्च महिना अर्धा उलटला तरी बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. परिणामी आता जोपर्यंत पगार मिळत नाही; तोपर्यंत कामावर जाणार नाही

मुंबई : मार्च महिना अर्धा उलटला तरी बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. परिणामी आता जोपर्यंत पगार मिळत नाही; तोपर्यंत कामावर जाणार नाही, असा निर्णय बेस्ट कामगारांनी एकमताने घेतला आहे. मात्र बेस्ट कामगारांचा पगार २0, २१ मार्चला होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड होत असतानाच याप्रश्नी गोंधळ झाला होता. याचदरम्यान बेस्ट संघटनाही आक्रमक झाल्या होत्या आणि याप्रश्नी बैठक घेण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता. त्यानुसार, शनिवारी ना.म. जोशी मार्गावरील बाळ दंडवते स्मृती सभागृह येथे सकाळी ११ वाजता बेस्ट संघटनांची बैठक झाली. या बैठकीला बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट जागृत कामगार संघटना, बेस्ट कामगार युनियन, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार संघटना, बेस्ट एम्प्लॉईज युनियन आणि बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.बेस्ट कामगार-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाच्या प्रश्नावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बेस्ट उपक्रमाचा कामगार हा मुंबई महापालिकेचा कामगार असल्याने बेस्ट कामगारांना वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बेस्ट देत असलेली बससेवा मुंबई महापालिका अनुदानित तिकीट दराने मुंबईकरांना देत आहे; परिणामी फायदा-तोट्याचा विचार करणे योग्य नाही, असे मत बैठकीत मांडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट उपक्रम सातत्याने तोट्यात असल्याचे म्हणणे मांडले जात आहे; परंतु हा खासगीकरणाचा डाव आहे, असेही मत बैठकीत मांडण्यात आले. (प्रतिनिधी)२० मार्चला सभा- २० मार्चपर्यंत बेस्ट उपक्रमाने कामगारांना वेतन दिले नाही तर २१ मार्चपासून जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामगार कामावर जाणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. - या अनुषंगाने २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता डिलाईल रोडवरील महाराष्ट्र हायस्कूल मैदान येथे कामगारांची सभा आयोजित करण्यात आली आहे.- शनिवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, बेस्ट अध्यक्ष आणि अधिकारी वर्गाची बैठक झाली. या बैठकीत वेतनाचा मुद्दा बेस्ट आणि महापालिकेने तात्पुरता सोडवला आहे. २१ आणि २२ मार्च रोजी कर्मचारी वर्गाला पगार दिला जाणार आहे.