शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हार्बरवर धावली बारा डबा लोकल

By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST

हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली

मुंबई : हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली आणि शुक्रवारपासून (२९ एप्रिल) ही लोकल धावण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी पहिली बारा डब्यांची लोकल पहाटे सहाच्या सुमारास वाशी ते वडाळा धावली आणि चार डब्यांपासून बारा डब्यांपर्यंतचा प्रवास हार्बरने पूर्ण केला. या लोकलमुळे प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ही ३३ टक्क्यांनी वाढणार आहे.भारतातील पहिली प्रवासी रेल्वे २२ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वेचा विकास टप्प्याटप्प्याने होत गेला. मेन लाइनवर पहिली लोकल धावल्यानंतर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला अशी चार डब्यांची लोकल १९२५ साली धावली आणि त्यानंतर हार्बर रेल्वेनेही कात टाकण्यास सुरुवात केली. हार्बर मार्गावर आठ डब्यांची लोकल सुरू करण्यासही जादा काळ लागला नाही. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढत गेली. एकीकडे बरोबरीने मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील लोकलचे डबेही वाढविण्याचे काम केले जात होते. हार्बरवर नऊ डब्यांची लोकल धावण्यास १९६३ साल उजाडले. परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मेन लाइनवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आणि हार्बर रेल्वे ही दुर्लक्षितच राहिली. १९८६ साली मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर पहिली बारा डब्यांची लोकल धावल्यानंतर या मार्गावर सर्व लोकल बारा डब्यांच्या करण्यास २५ वर्र्षे लागली. यानंतर हार्बर मार्गावरही अशी लोकल त्वरित सुरू होणे अपेक्षित असतानाच त्याला लेटमार्कच लागत गेला. २00९-१0 साली हार्बरवरील बारा डब्यांसाठी लोकल प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच हे काम डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाला. हार्बरवरील बारा डब्यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम हे सीएसटी स्थानकात होते. ते काम ७२ तासांत पूर्ण केले. तरीही वडाळा येथे मोटरमनला सिग्नल पाहण्यात होत असलेला अडथळा आणि डॉकयार्ड रोड स्थानकात प्लॅटफॉर्मची बाकी असलेली लांबी व उंची यामुळे काम आणखी रखडले होते. परंतु हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देत ते मार्गी लावण्यात आले. (प्रतिनिधी)प्रवाशांना कल्पना दिलीच नाही शुक्रवारपासून बारा डब्यांच्या लोकलच्या १४ फेऱ्या झाल्या. या फेऱ्या होताना ही बारा डब्यांची लोकल असल्याची कोणतीही उद्घोषणा हार्बर स्थानकांवर होत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडत होती. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिवसभरात चौदा लोकल फेऱ्या झाल्या आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. आणखी बारा डब्यांच्या लोकल लवकरच चालविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.