शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

८ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी

By admin | Updated: January 20, 2016 02:42 IST

सरकारी शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे चिक्कीवाटप करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे

मुंबई: सरकारी शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे चिक्कीवाटप करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे.आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांसाठी चिक्की, चटई व अन्य वस्तू घेण्यासाठी ‘ई- निविदा’ऐवजी ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ पद्धतीने कंत्राट देण्यात आले. या वस्तू खरेदीसाठी एका दिवसांत २४ शासन निर्णय काढण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका, नवी मुंबईचे संदीप अहिरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, राज्य सरकारने गेल्या १५ वर्षांत ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ पद्धतीने देण्यात आलेल्या कंत्राटांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली, ही माहिती राज्य सरकारनेच गेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाला दिली होती.२०६ कोटी रुपयांच्या चिक्की घोटाळयामुळे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे उच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी अंतरिम दिलासा देताना खंडपीठाने सरकारला चिक्कीवाटप थांबवण्याचा आदेश दिला. मंगळवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने चिक्की पुरवणाऱ्या कंत्राटदाराला थकबाकीची रक्कम न देण्याचा आदेशही सरकारला दिला. (प्रतिनिधी)