शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

By admin | Updated: September 8, 2014 02:49 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली

वसंत भोसले, कोल्हापूरकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शेवटची निवडणूक लढविणार असल्याचे सांगून त्यांच्या राजकारणाला नवे वळण दिले. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ गावी ८ जानेवारी १९४४ रोजी जन्मलेल्या डॉ. कदम यांनी आपला राजकीय प्रवास एसटी महामंडळाचे संचालक म्हणून सुरू केला. १९७८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भिलवडी-वांगी हा खानापूर आणि तासगाव तालुक्यांतर्गत मतदारसंघ निर्माण करण्यात आला. त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी तेव्हापासून केली. १९८० मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसचे उमेदवार संपतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढविली आणि केवळ २३३ मतांनी ते हरले.पहिल्याच निवडणुकीपासून त्यांना बंडखोरी, संघर्ष आणि तीव्र राजकीय लढा द्यावा लागला, तो आजअखेर सुरू आहे. त्यानंतर १९८५, १९९०, १९९५, १९९७ (पोटनिवडणूक), १९९९, २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. एकूण आठ निवडणुकांपैकी दोन वेळा ते अपक्ष म्हणून लढले. उर्वरित सहा वेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंग्ांणात राहिले. या आठपैकी पोटनिवडणुकीसह तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पाच निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादीतून लढून त्यांना प्रखर विरोध केला. त्यावेळच्या प्रचारसभेत ते म्हणायचे, ‘माझे राजकीय जीवन ही दुसरी बाजू आहे. शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांतील कार्य हा माझा मुख्य आधार आहे.’ आणि ते त्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. पूर्वी सुधाकरराव नाईक, शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील सरकारमध्ये ते कायम कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिले आहेत. आगामी निवडणुकीतदेखील त्यांना पहिल्या निवडणुकीसारखाच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. अशा संघर्षपूर्ण नेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी, ‘ही माझी अखेरची निवडणूक आहे,’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणातदेखील उमटतील.