शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या जाचाला कंटाळून चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

By admin | Updated: May 15, 2017 05:53 IST

ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी रविवारी हॉटेलमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी रविवारी हॉटेलमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. त्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून जीवन संपवीत असल्याचे म्हटले आहे. जागतिक मातृदिनी, ‘एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे, की मी माझ्या आईबरोबर राहणार आहे’ असे भावनिक विधान त्यांनी त्यात केले आहे. चित्रपटाच्या निर्मितीनंतर अतुल हे कर्जबाजारी देखील झाले होते. अतुल बाजीराव तापकीर (३५, रा. पिंपळे निलख, पुणे) हे कुटुंबीयांशी वाद झाल्यामुळे रविवारी रात्री हॉटेलमध्ये राहण्यास आले होते. सकाळी खोली स्वच्छ करायला कर्मचारी आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. एरंडवणा पोलिसांनी खोलीची तपासणी केली. त्यानंतर फेसबुकवरील तापकीर यांच्या पोस्टमुळे पत्नी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे समोर आले. तापकीर यांनी २०१५ मध्ये ‘ढोल ताशे’ चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र अपेक्षित व्यवसायाअभावी त्यांना मोठा तोटा झाला होता. त्यानंतर ते व पत्नी प्रियंका यांच्यात वादाला सुरुवात झाली. प्रियंका यांनी अतुल यांना घराबाहेर काढले. त्यांना भावाच्या मदतीने मारहाणही केली तसेच फोनवर शिवीगाळ केली, असे तापकीर यांनी म्हटले आहे. ---------वडिलांनी मुले सांभाळावीवडिलांनी माझ्या दोन मुलांचा सांभाळ करावा. रोजचा मानसिक छळ मला सहन होत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. -----------------पोलिसांवर आरोप; मुख्यमंत्र्यांना विनंतीमाझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, जसे पोलीस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे. मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी १० हजार मागितले. पोलीस म्हणाले, तू बरोबर आहेस; हे आम्हाला कळते. पण पहिली तक्रार तिने केली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, असे नोटमध्ये म्हटले आहे. अटक होऊ नये म्हणून १० हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर पोलिसांनी प्रियंकालाही रागावायला पाहिजे होते. बरेच पोलीस माझे मित्र आहेत. ते खूप चांगले आहेत. पण मला आलेल्या अनुभवाबद्दल मी भूमिका मांडतो आहे, असे अतुल यांनी नमूद केले आहे.