शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार

By admin | Updated: August 26, 2014 02:57 IST

चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री १०च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या.

मुुंबई : चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री १०च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरानी यांना गँगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून तपासही सुरू होता. त्यामुळे हा गोळीबारही पुजारी टोळीकडूनच झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.जुहू-विलेपार्लेच्या अशोक नगरातील शगुन इमारतीवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. याच इमारतीत मोरानी राहतात. मात्र हल्ला झाला तेव्हा मोरानी परदेशात होते. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबाराचा आवाज ऐकला. मोटारसायकलवरील तीन हल्लेखोरांनाही पाहिले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही चित्रणही तपासत आहेत.सीसीटीव्हीतही तीन हल्लेखोर कैद झाले असून, त्यांचे चेहेरे ओळखण्याइतपत स्पष्ट असल्याचे समजते. मोरानी घरी नसल्याने सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या दिवशी सकाळी मोरानी यांच्या बंधूंना हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार रविवारी संध्याकाळी मोरानी यांचे अन्य बंधू जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्याचे समजते. (प्रतिनिधी)