शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट उद्योगाला दुष्काळ दिसत नाही की असंवेदनशीलतेचा कळस?

By admin | Updated: April 25, 2016 03:00 IST

भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत

लोकमत स्पेशल , अनुज अलंकार - भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत. त्याबद्दल या कलावंतांचे आभार. मात्र, यातून एक प्रश्न उपस्थित होतो की, केवळ एवढेच कलावंत पुढे का आले, उर्वरित सर्वांना काय झाले? याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणू नये, तर काय म्हणावे. मदतीसाठी कोणावर बळजबरी केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. तथापि, यात नैतिकता व संवेदनशीलतेचा प्रश्न उपस्थित होतो. एक काळ होता जेव्हा चित्रपट उद्योग राष्ट्रीय आपत्तीस मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येत होता. दुष्काळ असेल किंवा पूर, भूकंप. संकट नैसर्गिक असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल. देशाची सेवा आणि मदत करण्यात चित्रपट उद्योग कधीही मागे राहिला नव्हता. मात्र, आता दुष्काळाबाबत चित्रपट उद्योगाने काहीही देणे-घेणे नसल्याची जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच चिंतादायक आहे. चित्रपट उद्योगातील मोठमोठे दिग्गज मौन बाळगत त्या राज्यातील लोकांच्या दैन्यावस्थेचा तमाशा पाहत आहेत. ज्या राज्याने त्यांना भरभरून दिले आहे. याआधी असे संकट निर्माण झाल्यानंतर चित्रपट उद्योग एकजुटीने प्रयत्न करीत असे. कधी चॅरिटी शो करण्यात येत होते, तर कधी उदार मनाचे तारे मदत घेऊन संकटग्रस्त भागात जात होते. अभिनेत्यांनी गाव दत्तक घेतल्याची उदाहरणेही आहेत. मात्र, आता वाटते की, प्रत्येक जण अधू झाला आहे. आमच्या राज्यातील शेतकऱ्यांची किती दैना सुरू आहे याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. संकटाची ही वेळ तर निघून जाईल. येणाऱ्या मान्सूनने परिस्थिती पालटेल, अशी आशा आहे; परंतु लाखो-कोट्यवधी रुपये कमावून आलिशान जीवन जगणाऱ्या ताऱ्यांचे हे दुर्लक्ष नेहमीच आठवणीत राहील. काही ताऱ्यांमध्ये माणुसकी उरली नसल्याचे हे द्योतक असून, याला निलाजरेपणाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही.