शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळ होणार ‘हाय-टेक’!

By admin | Updated: June 10, 2016 02:21 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात यंदा सत्तांतर झाल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, महामंडळ आता कात टाकण्याच्या मार्गावर आहे.

राज चिंचणकर,

मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात यंदा सत्तांतर झाल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, महामंडळ आता कात टाकण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार, महामंडळाचा चेहरामोहरा नजीकच्या काळात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांनी चित्रपट महामंडळ ‘हाय-टेक’ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी, महामंडळाचा कारभार नेटाने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. आधुनिकीकरणाची कास धरत, महामंडळ लवकरात लवकर डिजिटल कसे होईल, याकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे. महामंडळाचा ‘यू-ट्युब चॅनल’सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रभर पसरलेल्या महामंडळाच्या २५ हजार सदस्यांना एकत्र आणून त्यांना एकमेकांशी संलग्न करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सदस्यांशी थेट संपर्क निर्माण होण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक येथे जाऊन, महामंडळाचे १४ संचालक तिथल्या सदस्यांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.‘महामंडळाच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू,’ असे स्पष्ट करत, त्यांनी भविष्यकालीन उपक्रमही जाहीर केले आहेत. या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर किंवा मुंबई येथे महामंडळातर्फे देण्यात येणारे ‘चित्रकर्मी’ व ‘चित्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यात चित्रपट संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. २५ वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा कलावंतांना महामंडळ सन्माननीय सभासदत्व बहाल करणार आहे.