शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळ होणार ‘हाय-टेक’!

By admin | Updated: June 11, 2016 03:04 IST

यंदा सत्तांतर झाल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, महामंडळ आता कात टाकण्याच्या मार्गावर आहे.

राज चिंचणकर,

मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात यंदा सत्तांतर झाल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, महामंडळ आता कात टाकण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार, महामंडळाचा चेहरामोहरा नजीकच्या काळात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांनी चित्रपट महामंडळ ‘हाय-टेक’ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी, महामंडळाचा कारभार नेटाने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. आधुनिकीकरणाची कास धरत, महामंडळ लवकरात लवकर डिजिटल कसे होईल, याकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे. महामंडळाचा ‘यू-ट्युब चॅनल’सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रभर पसरलेल्या महामंडळाच्या २५ हजार सदस्यांना एकत्र आणून त्यांना एकमेकांशी संलग्न करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सदस्यांशी थेट संपर्क निर्माण होण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक येथे जाऊन, महामंडळाचे १४ संचालक तिथल्या सदस्यांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.‘महामंडळाच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू,’ असे स्पष्ट करत, त्यांनी भविष्यकालीन उपक्रमही जाहीर केले आहेत. या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर किंवा मुंबई येथे महामंडळातर्फे देण्यात येणारे ‘चित्रकर्मी’ व ‘चित्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यात चित्रपट संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. २५ वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा कलावंतांना महामंडळ सन्माननीय सभासदत्व बहाल करणार आहे. महामंडळाच्या सदस्यांशी थेट संपर्क निर्माण होण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक येथे जाऊन, महामंडळाचे १४ संचालक तिथल्या सदस्यांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याची माहिती मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.