शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शालेय पोषण आहारात डाळींवर भर!

By admin | Updated: July 13, 2016 01:28 IST

आहाराच्या मेन्यू कार्डात बदल क रून तूर डाळीचा पुन्हा आंतर्भाव केला जाणार आहे.

ब्रम्हानंद जाधव/ बुलडाणा भाववाढीमुळे शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शालेय पोषण आहारामधून गायब झालेली तुरडाळ यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून पूर्ववत देण्यात येणार आहे. इयत्ता पहिल्या ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार मिळावा, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केलेली आहे. शालेय पोषण आहारासाठी लागणारे साहित्य शासनाकडून पुरविल्या जाते, तसेच इतर साहित्यासाठी प्रति विद्यार्थी रोख अनुदानही दिल्या जाते; परंतु शासनाकडून इतर साहित्यासाठी दिले जाणारे अनुदान कमी पडत असल्यास पोषण आहारातील महागलेले साहित्य बंद करून त्याठिकाणी पर्यायी साहित्य वापरले जात असल्याचा प्रकार गतवर्षी पाहावयास मिळाला. गेल्यावर्षी तूर डाळीचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामान्यांपासून ते विद्यार्थ्यांंच्या ताटातले वरण गायब झाले होते. शालेय पोषण आहारात तूर डाळीऐवजी इतर डाळी वापरण्यात येत होत्या. विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत या चालू शैक्षणिक सत्रात यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला असून गतवर्षी भाववाढीमुळे बंद झालेली तूर डाळ सुरू करण्यात येणार आहे, तसेच नवीन शैक्षणिक सत्रातील शालेय पोषण आहाराच्या मेन्यू कार्डात बदल झाला असून, त्यामध्ये मूग डाळ, मसुर डाळ, तूर डाळ, हरभरा आदी डाळींवर भर देण्यात आला आहे. सोमवार ते शनिवारचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे; तसेच शासनाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा परिषदमधील शालेय पोषण आहार विभागाकडे पोषण आहारातील साहित्याचे नवीन दरपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यानुसार शालेय पोषण आहारासाठी अनुदान देण्यात येणार आहे, तसेच आलेल्या दरपत्रकाप्रमाणे पोषण आहारातील साहित्य खरेदी करावे लागणार आहे. पोषण आहारातील साहित्याचे नवीन दरजि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाकडे २0१६-१७ या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शासनाने पोषण आहारातील साहित्याचे नवीन दरपत्रक पाठविले आहे. त्यामध्ये मूग डाळ १0८ रुपये किलो, मसुर डाळ ९४ रुपये, तूर डाळ १५४ रुपये, हरभरा ६७ रुपये, चवळी ६५, मटकी ९४, मूग ९७, वाटाणा ६३, तेल ९९ रुपये प्रतिलिटर, कांदा, लसूण मसाला १९१ रुपये, हळद पावडर २0५ रुपये, मीठ ११ रुपये, जिरे १९0 रुपये, मोहरी ७४ रुपये, मिरची पावडर १९१ रुपये, गरम मसाला १९१ रुपये, तांदूळ वाहतूक खर्च प्रतिकिलो १.२0 रुपये दर देण्यात आले आहेत.