शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी

By admin | Updated: September 22, 2014 00:50 IST

रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे.

मार्गात ब्रेकडाऊन : कार्यशाळा अधिकाऱ्यांचीही चालढकलयवतमाळ : रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र केवळ चालढकल सुरू असल्याने रेडिएटर नसलेल्या एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. परिणामी प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ब्रेकडाऊन ही बाब एसटी महामंडळाच्या पाचवीला पुजली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेळ, काळ, स्थळ न पाहता बंद पडते. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आडवळणाच्या गावात बंद पडलेली बस जीवाला घोर लावणारी ठरते. या सर्व बाबींची कल्पना असतानाही सुस्थितीतील बस मार्गावर पाठविण्याचे सौजन्य महामंडळाकडून दाखविले जात नाही. आता तर त्यात कळस गाठला आहे. चक्क रेडिएटर नसलेल्या बसेस सोडल्या जात आहेत. शनिवारी ८६५३ क्रमांकाची यवतमाळ-घाटंजी ही बस याच प्रकारातील आहे. यवतमाळपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाजवळ ही बस थांबली. या बसला रेडिएटरच नव्हते. गरम झाल्यामुळे थांबलेल्या बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आगारातून बस सोडताना ती रस्त्यावर धावण्यापूर्वी सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक आणि या विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु या बाबीशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या तोऱ्यात ते वागत असतात. त्यामुळे महामंडळाची जागोजागी नाचक्की होत आहे. परिणामी उत्पन्नावरही फरक पडत आहे. (वार्ताहर)पासिंग संपलेल्या बसेस रस्त्यावरवाहन कोणतेही असो, त्यासाठी आरटीओचे नियम आहे. हेच नियम एसटी महामंडळालाही लागू आहेत. मात्र महामंडळाच्या काही बसेस पासिंग संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहे. केवळ शासनाचा उपक्रम म्हणून नियमातून सवलत मिळत असल्याने महामंडळही गंभीर नाही. ५०२४ या क्रमांकाची बस पासिंग झालेले नसतानाही नांदेडसाठी सोडण्यात आली. वास्तविक बस पासिंगसाठी महिनाभरापूर्वीच नियोजन केले जाते. सदर क्रमांकाच्या बसचे शनिवारी पासिंग होणार होते. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. मात्र त्यावेळी बस बऱ्याच दूरपर्यंत पोहोचली होती. पासिंग नसलेल्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कुठलाही लाभ मिळत नाही. शिवाय चालकांवरही कारवाई केली जाते. मात्र या बाबीला जबाबदार अधिकारी कारवाई टाळली जाते.