शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खुटारी गावातील तलावात भराव

By admin | Updated: June 30, 2016 02:42 IST

तलावात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे काम मागील काही दिवसांपासून पनवेल येथील खुटारी गावात सुरू आहे.

वैभव गायकर,

पनवेल- गाव वसण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तलावात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे काम मागील काही दिवसांपासून पनवेल येथील खुटारी गावात सुरू आहे. मौजे रोहिंजन ग्रामपंचायत हद्दीतील खुटारी ग्रामस्थांच्या मालकीच्या सुमारे १० एकर सार्वजनिक जागेवर वसलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पनवेल तहसीलदारांकडे लेखी तक्र ार केली आहे. एकीकडे पाण्याचे स्रोत वाचविण्यासाठी शासन जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवत असताना पनवेलमधील खुटारी गाव त्याला अपवाद आहे. येथील ग्रामस्थ गणेश म्हात्रे यांनी या विषयाला वाचा फोडली असून येथे सुरू असलेला बेकायदा भराव त्वरित थांबवावा यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मात्र महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर ही कोणतीच कारवाई होत नसल्याने खुटारी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. खुटारी परिसरात सिडको अथवा खासगी जागेत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येथील बेकायदा कामाची चौकशी व्हावी व संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे पत्र ग्रामस्थ गणेश म्हात्रे यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना दिले आहे. विशेष म्हणजे खुटारीसह रोहिंजन, बीड, किरवली आदी याठिकाणच्या तलावाच्या पाण्यावर याठिकाणची शेती अवलंबून होती. पिण्याच्या पाण्यासाठी देखील परिसरातील हे एकमेव स्रोत ओळखले जात होते.यासंदर्भात माहिती घेतली जाईल. तलावामध्ये भराव केला गेला असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल.- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल