शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर भर!

By admin | Updated: April 24, 2017 01:15 IST

पश्चिम विदर्भात यावर्षी बियाणे, खतांचा मुबलक साठा; पीक कर्ज वाटप सुरू

अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. वऱ्हाडातील शेतातील कर्बाचे प्रमाण घसरले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने उपाययोजना करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, ७ हजार ७५ कोेटी पीक कर्जाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.पश्चिम विदर्भात खरीप हंगामाचे जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्र असून, यामध्ये १६ लाख हेक्टर सोयाबीनचे आहे. कापसाची पेरणी यावर्षी जवळपास ९ लाख हेक्टरपर्यंत होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागच्या वर्षी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी हेक्टरी १२ ते १४ क्विंटल झाले हे उत्पादन कमी असून, हेक्टरी ३० क्विंटलपर्यंतचा उतारा येऊ शकतो, असा कृषी विभागाने अभ्यास केला आहे. त्यादृष्टीनेच यावर्षी पावले उचलण्यात आली असून, येत्या २८ मे ८ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्यातर्फे याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे.शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासून शेती करावी म्हणजे अनावश्यक खर्च टळेल व उत्पादन भरपूर घेता येईल या करिता शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात १६ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करायचे आहे त्यातील आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना लाख मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.सरासरी उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी यावर्षी भर देण्यात आला आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. २८ मे ८ जून या सप्ताहात शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.- शु.रा. सरदार, विभागीय कृषी संयुक्त संचालक, अमरावती.