शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

बदनामीकारक लिंक्स पाठविणार्‍यांवरही गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: June 10, 2014 23:59 IST

लिंक पाठविणार्‍यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली.

ग्रामीण पोलीस अधीक्षकांची माहितीपुणे सोशल मिडीयामधून महापुरूषांविषयी बदनामीकारक प्रसारण झाल्यानंतर ते इतरांना प्रसारित करणार्‍यांवर,लिंक पाठविणार्‍यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली.तणाव निर्माण करणार्‍या घटनंाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने आज सर्वधर्मीय, सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.शांतता समितीच्या बैठकीनंतर लोहिया, जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लोहिया म्हणाले की तणावग्रस्त स्थितीत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत योग्य कारवाई केली जाणार आहे.मात्र सोशल मिडियावर जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध होतो,त्याचा सर्व्हर अमेरिकेत असतो.या मजकुराच्या लिंक वाढतात.त्यांना आवर घालणे अशक्य होते.मात्र अशा लिंक्स ज्या व्यक्ती इतरांना पाठवतील,त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.अशा गुन्ह्यांमध्ये ३वर्षे शिक्षेची तरतूद आहे.ज्यांनी दगडफेक करून सरकारी, खासगी वाहनांचे, मालमत्तांचे नुकसान केले आहे, अशांकडून भरपाई करून घ्यावी असा सूर या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राव यांनी नुकसान भरपाईची कारवाई सुरू करू, असे आश्वासन दिले.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांनी पंधरा ते पंचवीस वयोगटातील मुलांकडे मोबाईल असतात.त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जावे, अशी मागणी केली.छाजेड आणि माळवदकर यांनी जेथे हिंसक प्रकार होतील तेथे मान्यवर नेत्यांना पाचारण करून संतप्त लोकांचे मन वळवावे, असे आवाहन केले.अशा परिस्थितीत अफवा पसरविल्या जातात.मालमत्तेचे नुकसान केले जाते.छोट्या कारणांवरून प्रक्षुब्ध होऊन हिंसाचार केला जातो,असे सांगून राव यांनी असे प्रकार होऊ नयेत, असे आवाहन केले.दरम्यान, महापुरूषांची फेसबुकवर बदनामी होण्याच्या प्रकारात ग्रामीण व शहरी भागात ११२गुन्हे दाखल झाले असून ४६लाख७८हजार रूपये किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे,अशी माहिती बैठकीच्या प्रारंभी सांगण्यात आली.यापेक्षा नुकसानीची रक्कम अधिक असू शकते.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या संख्येवरून हा आकडा काढण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.२०गावांमध्ये बंद पाळण्यात आला.६ठिकाणी रस्ता रोखा आंदोलने झाली.जाळपोळ, दगडफेक,दहशतीच्या घटना झाल्या.विविध ठिकाणच्या शांतता समित्यांच्या ५२बैठका झाल्या, असे सांगण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांच्यासह विविध स्तरांमधील अधिकारी,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड,पुणे पालिकेतील शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे,भाजपचे गटनेते अशोक येनपुरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र माळवदकर, तालुका स्तरावरील शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.