शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 24, 2017 02:02 IST

खामगाव : श्री शिवाजी व्यायाम मंदिर संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : खोटे दस्त तयार करुन कट रचत शासकीय रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिरास परत देणे, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, व्यायाम मंदिराचे सचिव दिगंबर खासणे, सहसचिव महावीर थानवी, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे, तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध २३ मे रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खामगाव नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन दयाराम जोशी यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, शहरातील श्री शिवाजी व्यायाम मंदिराची जागा ही शासकीय जागा नसताना त्यावर बांधकामासाठी घेण्यात आलेल्या दानपत्रासाठी गैरकायदेशीर शर्ती व अटी मंजूर करुन श्री शिवाजी व्यायाम मंदिरासाठी अनुदान प्राप्त करुन घेणे, या व्यायाम मंदिराच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेस परत करण्यात आला. यासाठी गैरकायदेशीर अट टाकून दानपत्र करण्याच्या अर्जावर मंजुरी देत सहायक धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्या आदेशाचा आधार घेत तत्कालीन नगराध्यक्ष सरस्वती खासणे यांनी २३ मे २००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेतला. सदर ठराव मंजूर करताना त्यांनी स्वत:सह अशोक सानंदा यांना तटस्थ दाखविले. मात्र सरस्वती खासणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत देण्याकरिता आदेश दिले होते. त्यानंतर अशोक सानंदा नगराध्यक्ष झाल्यावर नगर परिषदेच्या ताब्यात नसलेल्या श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या इमारतीमध्ये प्रस्ताव क्रमांक १६ नुसार विविध विकास कामांना मंजुरी देत नगर परिषद मालमत्तेचे नुकसान करुन श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेचा फायदा केला. तर तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही संस्थेला शासनाच्या रकमेचा अपहार करण्यास सहकार्य केले. जागेचे दानपत्र झाल्यावर श्री शिवाजी व्यायाम मंदिराची जागा नझूल विभागामध्ये पालिकेच्या नावावर करुन घेतली, परंतु कर आकारणी सूचीनुसार सदर जागा अद्यापपर्यंत श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या मालकीची व ताब्यात आहे. यानंतर सदर जागेबाबतचे दस्त नगर पालिकेतून गहाळ झाले असून, याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारसुध्दा देण्यात आली आहे. श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या इमारतीच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार विकास निधीमधून २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले असताना कोनशिलेवर ५० लक्ष रुपये खर्च करुन दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर परिषद रेकॉर्डनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर जागा नगर परिषदेच्या ताब्यात दिली नाही, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगर परिषदेने प्राप्त केलेल्या दस्तामध्ये सदर जागा मुख्याधिकारी देशमुख यांनी २० मे २०१० रोजी न.प.ने ताब्यात घेतली असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. याबाबतचा दस्त साध्या कागदावर असून, त्यावर कोणत्याही विभागाचे नाव नाही. तसेच दिनांक, आवक-जावक क्रमांक नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात उपलब्ध नाही. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कलम ११९, १२० (ब), १९३, १९६, २०१, २०४, २१७, २१८, ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४१८, ४२०, ४२३, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.