शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मोफा अंतर्गत पहिला गुन्हा दाखल

By admin | Updated: July 28, 2016 13:12 IST

एखाद्या बिल्डरने फसवणूक केल्यास त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात ‘मोफा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

मुंबई: एखाद्या बिल्डरने फसवणूक केल्यास त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात ‘मोफा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पोलीस महासंचालकांनी काढलेल्या या पत्रकानुसार गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी याच महिन्यात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे परिपत्रक काढले होते. लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप बसण्याकरता मोफा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार  देशबन्धू गुप्ता, खुशीराम गुप्ता, नीलेश गुप्ता या त्यांच्या पार्टनर विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार प्रवीण अग्रवाल ‘हब मॉल प्रिमायसेस को आॅप सोसायटी लिमिटेड’चे सचिव आहेत. २००५ मध्ये त्यांनी या मॉलमधील ७५ टक्के गाळे विकत घेतले होते. मात्र गाळे विकल्याच्या सहा महिन्यानंतरही  यांनी सोसायटी बनविली नाही. याउलट मॉल शेजारी ‘लोढा फिओरेन्ज’ नावाच्या तीन साठ मजली टॉवरचे काम सुरु केले. ज्याच्यासाठी आमचा दीड लाख स्क्वेअर फूट एफएसआय अनधिकृतपणे वापरला. याप्रकरणी आम्ही दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. ‘एनओसी नसताना हा एफएसआय वापरल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी सुरु आहे’, अशी माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)