शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

By admin | Updated: October 6, 2016 05:36 IST

इफेड्रीन तस्करीप्रकरणी एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर न्यायालयात ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे

अमित सोमवंशी , सोलापूरइफेड्रीन तस्करीप्रकरणी एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर न्यायालयात ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. कंपनीतील दैनंदिन चालणाऱ्या व्यवहाराबाबत कंपनीचे पूर्णवेळ संचालक मनोज जैन व कंपनीचे कार्यकारी चेअरमन अजित कामत, अकार्यकारी संचालक राजेंन्द्र कैमल, व्यावसायिक व्यवस्थापाक प्रभाकर हजारे हे जबाबदार असल्याचे दोषारोपत्रात म्हटले आहे.चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत शेकडो टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर रोज नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत़‘एव्हॉन’ला अन्न औषध प्रशासन विभागाकडून परवाना क्रमांक पीडी/१२५ अन्वये आठ प्रकारच्या औषध पावडरचे उत्पादन करण्यासाठी साठी १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत परवाना देण्यात आला होता. परंतु कंपनीने डी.एल.इफ्रेड्रीन बेस या मंजुरी नसलेल्या औषधी पावडरची दोन वेळा दोन कंपन्यांना विनारपवाना विक्री केली. कंपनीने उत्पादन विषयक इ व फ मध्ये क्षेत्रीय संचालक, गुंगीगारक औषधीद्रव्ये नियंत्रण केंद्र, मुंबई यांना तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तरीही कंपनीने जुलै ते संप्टेंबर २०१३, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३ व जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांचा कालावधीत तिमाही अहवाल क्षेत्रीय संचालक गुंगीकारक औषधद्रव्ये मुंबई यांना पाठविलेला नाही. तपासात पोलिसांनी वीस साक्षीदारांचे जवाब नोंदवून घेतले.