शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल

By admin | Updated: November 16, 2016 19:39 IST

आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १६ : आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदी झाल्यामुळे पत्राद्वारे पुर्वकल्पना देऊनही बँकेमधून पैसे न मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. नोटा बंदीवरुन पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे.

अ‍ॅड. तोसिफ शेख (वय 25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी लेखी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा तक्रार अर्ज स्विकारला. शेख यांचे स्टेट बँक आॅफ इंडीयामध्ये बचत खाते आहे. खात्यामधील त्यांची जमा, ठेव रक्कम जेव्हा ग्राहकाला लागेल तेव्हा उपलब्ध करुन देणे बँकेला बंधनकारक असल्याचा कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला आहे. शेख यांना बँकेमधून 30 हजार रुपये तातडीने काढावयाचे होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बँकेमध्ये अर्ज केला होता. त्यावेळी बँक व्यवस्थापकाने त्यांना हवी असलेली रक्कम देता येणार नाही असे सांगितले.

प्रधानमंत्री आणि गव्हर्नर यांनी मोठी रक्कम देण्यावर निर्बंध घातले आहेत. तातडीची गरज असल्याचे सांगूनही त्यांना रक्कम दिली गेली नाही. तसेच विश्वासाने ठेवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उर्जीत पटेल यांच्या आदेशाने ही रक्कम परत न देता अन्यायाने विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध भादवि कलम 406, 409, 420, 34 नुसार तक्रार देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. - लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जराही विचार न करता हा निर्णय दामटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी विश्वासाने ठेवलेली माझ्या हक्काची रक्कम मला देणे हे बँकेला कायद्याने बंधनकारक आहे. शासनाचा कोणताही अध्यादेश कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. माझी रक्कम मला न देता अपहार केल्याचा माझा आरोप आहे. पुरेसे चलन आणि नोटा उपलब्ध करुन देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे. - अ‍ॅड. तौसिफ शेख