शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: March 9, 2017 04:40 IST

भोसरी जमीन हस्तांतरणासंदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. तर स्थानिक पोलीसांनी केलेल्या

मुंबई : भोसरी जमीन हस्तांतरणासंदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. तर स्थानिक पोलीसांनी केलेल्या तपासावर उच्च न्यायालय असमाधानी असल्याने याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत.भोसरी येथील एमआयडीसीची सुमारे तीन एकर जागा खडसे यांनी पदाचा गैरवापर करत अगदी किरकोळ भावाने खरेदी केली. बाजार भावानुसार संबंधित जमिनीची किंंमत ४० कोटी रुपये आहे, तर खडसे यांनी ती जमीन अवघ्या ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत गावंडे यांनी केला आहे. याचिकेवरील मंगळवारच्या सुनावणीत खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत २४ तासांत भूमिका स्पष्ट करण्यास न्यायालयाने सांगितले होते.बुधवारच्या सुनावणीत याचिकाकर्ते हेमंत गावंडे यांचे वकील एस. एस. पटवर्धन यांनी स्थानिक पोलिसांनी गावंड यांना लिहिलेले पत्र न्या. रणजीत मोरे व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठापुढे सादर केले. मागील सुनावणीतही उच्च न्यायालयाने स्थानिक पोलिसांच्या तपासावर नाराजी दर्शवत राज्य सरकारने काही निर्णय न घेतल्यास आम्हीच योग्य तो आदेश देऊ, असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अखेरीस बुधवारी ‘जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास एसीबीच करू शकते, त्यामुळे त्यांच्याकडेच हा तपास वर्ग करत आहोत,’ असे विशेष सरकारी वकील नितीन प्रधान यांनी खंडपीठाला सांगितले. तर आधी खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवा असा आदेश खंडपीठाने सरकारला दिला.सुरुवातील प्रधान यांनी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देऊ नका, अशी विनंती खंडपीठाला केली. मात्र खंडपीठानेही राज्य सरकारचा डाव ओळखत, गुन्हा नोंदवण्याची हमी द्या तरच तपास वर्ग करण्याची परवानगी देऊ. खंडपीठाच्या या भूमिकेमुळे कोंडीत सापडलेल्या सरकारला एसीबी गुन्हा नोंदवेल, अशी हमी द्यावी लागली.हा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याने करू नये. तसेच एसीबीच्या अतिरिक्त संचालकांच्या देखरेखीखाली हा तपास करण्यात यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला. त्यावर प्रधान यांनी असा आदेश न देण्याची विनंती खंडपीठाला केली. ‘एसीबी प्रामाणिकपणे तपास करते. जर ते भ्रष्टाचारी आहेत, असे ग्राह्य धरले तर राज्यातील एकही संस्था भ्रष्टाचारमुक्त आहे, असे म्हणता येणार नाही,’ असे प्रधान यांनी नमूद केले. मात्र खंडपीठाने प्रधान यांचे म्हणणे नाकारले. नंतर खंडपीठाने ३ एप्रिल रोजी एसीबीला तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)

तपास जलदगतीने करावा‘भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास एका आठवड्यात एसीबीकडे वर्ग करण्यात यावा आणि एसीबीने रीतसर एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवावा. तपास जलदगतीने करावा. तपास करताना स्थानिक पोलिसांनी जो निष्कर्ष काढला आहे, तो ग्राह्य धरू नका. तसेच झोटिंग आयोगाच्या अहवालाचाही विचार करू नका. तुम्ही (एसीबी) हा तपास स्वतंत्रपणे कराल,’ असे न्या. रणजीत मोरे व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.