शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी दटके, डवरे, जयस्वाल यांच्यात लढत

By admin | Updated: September 2, 2014 01:15 IST

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीचा विजय निश्चित असतानाही, सोमवारी काँग्रेस व बसपाने उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक

उपमहापौरपदासाठी पोकुलवार यांचा अर्ज : काँग्रेस व राष्ट्रवादीत संघर्षाची चिन्हे ंनागपूर : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीचा विजय निश्चित असतानाही, सोमवारी काँग्रेस व बसपाने उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक अरुण डवरे व बसपाच्या हर्षला जयस्वाल यांच्यात महापौरपदासाठी लढत होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पराभूत होणार असलो तरी लढा देऊ, अशी भूमिका काँग्रेस व बसपा या दोन्ही पक्षांनी घेतली. उपमहापौरपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत एकमत नसल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी भाजपतर्फे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी अर्जाचे चार संच दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर अनिल सोले, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, अविनाश ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेसतर्फे नगरसेवक अरुण डवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी सुजाता कोंबाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने महापौरपदासाठी उमेदवार दिला नाही. मात्र, उपमहापौरपदासाठी नगरसेवक राजू नागुलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत आ. प्रकाश गजभिये, गटनेत्या प्रगती पाटील होत्या. बसपातर्फे शबाना परवीन मो. जमाल यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)गरज पडल्यास फारकत!काँग्रेस व राष्ट्रवादीने उपमहापौरपदासाठी वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवीत गरज पडल्यास ते एकमेकांपासून फारकत घेऊ शकतात, याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून या दोन्ही पक्षात जुंपली आहे. त्याचे पडसाद नागपूर महापालिकेतही दिसू लागले आहेत. आजवर राष्ट्रवादीने महापालिकेत काँग्रेसला साथ दिली. आता उपमहापौरपदासाठी दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एक नवा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे.