शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाईच्या बचावासाठी बिबट्याशी झुंज

By admin | Updated: September 11, 2015 03:04 IST

गावातील शेतकऱ्यांचे पशुधन घेऊन जंगलात जायचे... दिवसभर रानात भटकंती करायची अन् सायंकाळी जनावरांना घेऊन गावात परत यायचे. असा गुराख्यांचा नित्यक्रम.

- नितीन मुसळे ,  सास्ती (चंद्रपूर) गावातील शेतकऱ्यांचे पशुधन घेऊन जंगलात जायचे... दिवसभर रानात भटकंती करायची अन् सायंकाळी जनावरांना घेऊन गावात परत यायचे. असा गुराख्यांचा नित्यक्रम. मात्र बुधवारी एका गुराख्याला जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागला. चुनाळा येथील जंगलात एका बिबट्याने कळपातील गाईवर हल्ला केला आणि गुराख्याने प्रसंगावधान दाखवत चक्क त्या बिबट्याशी झुंज दिली. गुराख्याच्या तीव्र प्रतिकारामुळे बिबट तेथून पळून गेला. सुदैवाने गाय आणि गुराखी दोघेही बचावले.चुनाळा येथील ५५ वर्षीय यादव मारोटी टेकाम हा बुधवारी दुपारी ३.३०च्या सुमारास जंगलात गाई चारत असताना समोरुन अचानक एक बिबट आला. त्याने एका गाईवर हल्ला चढविला. मात्र यादवने न घाबरता त्या बिबट्याशी झुंज देत नाना युक्त्या करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरडाओरड करून त्या बिबट्याला तेथून पळवून लावले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी झाली असली तरी तिचा जीव वाचला.जंगली जनावरांचा वावर लगतच्या परिसरात वाढला असून त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. बिबट्याने आपली भूक भागविण्यासाठी गाईवर हल्ला करून तिला शिकार बनविण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या जनावरांच्या रक्षणासाठी त्याला तिथून पळवून लावले. त्याने त्याचे काम केले मी माझे काम केले, असे टेकाम याने सांगितले.