शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लढा दारूमुक्त खारघरसाठी...

By admin | Updated: February 26, 2017 02:02 IST

दारूमुक्त खारघरसाठी मागील एक दशकापेक्षा जास्त काळ लढा सुरू आहे. सिडकोच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या नियोजनबद्ध अशा खारघर नोडला दारूमुक्त करण्याचा

- वैभव गायकरदारूमुक्त खारघरसाठी मागील एक दशकापेक्षा जास्त काळ लढा सुरू आहे. सिडकोच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या नियोजनबद्ध अशा खारघर नोडला दारूमुक्त करण्याचा उद्देश उराशी बाळगून संघर्ष या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या लढ्याला खऱ्या अर्थाने २००२ सालापासून सुरुवात झाली. कोपरा गावात अजित पॅलेस बारच्या विरोधात सुरू झालेल्या या लढ्याचे रूपांतर मोठ्या लढ्यात झाले. कालांतराने वसाहतीमधील नागरिकांनी पाठिंबा देत २००७ साली संघर्ष समितीची स्थापना केली. त्यानंतर दारूमुक्तीचा लढा तीव्र झाला. त्याला २०१७मध्ये १० वर्षे पूर्ण होत आहेत. खारघरमधील कोपरा गावातून सुरू झालेला हा लढा शहरभर पसरला. यात खारघर ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा वाटा असून, ग्रामपंचायतीने खारघरला दारूमुक्त करण्याचा ठराव करून राज्य शासनाकडे पाठविला होता. येथे काही हॉटेल्सना राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी विशेष अधिकार वापरून दारूविक्रीचा परवाना बहाल केल्यानंतर प्रचंड असंतोष निर्माण झाला. रायगड जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय शासकीय समितीने याला विरोध दर्शवला होता. हाच विषय राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांनी यासंबंधी विषय राखून ठेवला आहे. सर्वोच्च्च न्यायालयाच्या आदेशानुसार खारघर शहरातील दोन दारूची विक्री करणारी हॉटेल्स १ एप्रिलपासून बंद होणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने संघर्षच्या लढ्याला यश येणार आहे.खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी आम्ही शपथ घेतली आहे. येणारी पिढी सुदृढ हवी तर शहरवासीयांनी आपले योगदान दिले पाहिजे. मंत्र्यांनी राखून ठेवलेल्या निर्णयावर या वर्षात सकारात्मक निर्णय येईल अशी आशा आहे. तसेच १ एप्रिलनंतर महामार्गालगतची दारू विक्रीची दुकाने बंद होणार असल्याने आमच्या लढ्याला यश येणारच आहे. - संजय जाधव, अध्यक्ष, संघर्ष समिती खारघर