शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढायची... आधी मुलांना शिकवा!

By admin | Updated: December 26, 2016 04:16 IST

शाळाबाह्य मुलांची आकडेवारी कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने रामबाण उपाय सुचविला आहे.

यवतमाळ : शाळाबाह्य मुलांची आकडेवारी कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने रामबाण उपाय सुचविला आहे. एखाद्या पालकाला निवडणूक लढवायची असेल, तर आधी त्याने आपला पाल्य नियमित शाळेत जात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे, अशी अट घालण्याची शिफारस आयोगाने केली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ही शिफारस लागू होण्याची शक्यता आहे.शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल कसे करता येईल, याबाबत एप्रिलमध्ये बालहक्क आयोगाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटीच्या सहकार्याने बैठक घेतली होती. शाळाबाह्य मुले शोधणे आणि त्यांना परत शाळेत दाखल करून घेणे याबाबत बैठकीत आराखडा तयार करण्यात आला. त्यातून राज्य सरकारांना एकंदर ४५ शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यात शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी १० उपाय सुचविण्यात आले तर त्यांना परत शाळेत दाखल करण्यासाठी २५ उपाय देण्यात आले.आयोगाकडून निवडणूक आयोगालाही निवडणूक नियमांत बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीकडून आधी त्याचा पाल्य नियमित शाळेत जात असल्याचे प्रमाणपत्र मागविण्यात यावे. त्याने हे प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडूनच प्राप्त केले पाहिजे. पाल्य शाळेत दाखल असून तो नियमित शाळेत जात असल्याचे त्या प्रमाणपत्रात नमूद असले पाहिजे. अशी सुधारणा निवडणूक नियमांत करावी, याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मुलगा शाळेत असेल तरच वडिलांना मजुरीगावात मनरेगा अंतर्गत कामे सुरू असतील आणि त्यावर एखाद्या मजुराला काम मिळवायचे असेल, तर त्यानेही आधी शाळेकडून प्रमाणपत्र सादर केले पाहिजे. संबंधित मजुराचा मुलगा किंवा मुलगी नियमित शाळेत जाते, याबाबत मुख्याध्यापकाने प्रमाणपत्र दिल्यावरच त्या मजुराला मनरेगाअंतर्गत काम दिले जावे, अशीही शिफारस बालहक्क संरक्षण आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे.