शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

संकटाचा धाडसाने सामना करा

By admin | Updated: June 10, 2014 01:17 IST

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने

ज. स. सहारिया यांचे आवाहन : ‘आव्हान-२0१४’ चे उद्घाटन नागपूर : आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने सामना करण्याचे कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव  ज. स. सहारिया यांनी केले. चान्सलर्स ब्रिगेडच्यावतीने ‘आव्हान-२0१४’ या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नागपूर  विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सहारिया बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून विभागीय आयुक्त व राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, एनडीआरएफचे  उपसमादेशक भैरवनाथन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक अतुल साळुंके, नागपूर  विद्यापीठाचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर उपस्थित होते. या शिबिरात राज्यभरातील २0  विद्यापीठांमधील सुमारे ११२५ विद्यार्थ्यांंनी भाग घेतला आहे. यावेळी सहारिया यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांंना आव्हानांचा सामना करण्याची शपथ दिली. विभागीय आयुक्त व नागपूर  विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार यांनी विद्यार्थ्यांंंना मार्गदर्शन करताना, सध्या नागपुरात तापत असलेले ऊनसुद्धा एक नैसर्गिक आव्हान समजून  विद्यार्थ्यांंनी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन केले.  (प्रतिनिधी)