शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरोधातील लढा पडला महागात

By admin | Updated: April 4, 2015 04:33 IST

पेण तालुक्यातील वडखळजवळील निगडे ग्रामस्थ मंडळाची कोणतीही शासकीय नोंदणी नाही. असे असतानाही ग्रामस्थांकडून धार्मिक व इतर सामाजिक कामांच्या

जयंत धुळप, अलिबागपेण तालुक्यातील वडखळजवळील निगडे ग्रामस्थ मंडळाची कोणतीही शासकीय नोंदणी नाही. असे असतानाही ग्रामस्थांकडून धार्मिक व इतर सामाजिक कामांच्या नावाखाली लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करून त्याचा अपहार करून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक झाल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या गावातील जनार्दन शिवराम नाईक यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकल्याप्रकरणी वडखळ पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल झालेल्या १८ जणांमध्ये निगडे ग्रामस्थ मंडळ प्रमुख पोलीस पाटील नंदकुमार माया म्हात्रे यांच्यासह चंद्रकांत अंबाजी नाईक, हरिश्चंद्र माया म्हात्रे, हिरामण नारायण नाईक, हरिश्चंद्र नारायण नाईक, यशवंत रामा म्हात्रे, परशुराम पोशा नाईक, सखाराम गोविंद मोकल, विश्वनाथ गोविंद्र म्हात्रे, मोहन कृष्णा मोकल, तुकाराम नारायण नाईक, पांडुरंग महादेव नाईक, नामदेव महादेव नाईक, रघुनाथ खंडू नाईक, लक्ष्मण अंबू नाईक, हेमंत गोविंद म्हात्रे, कृष्णा अंबाजी नाईक, गणेश हरिश्चंद्र नाईक यांचा समावेश आहे.निगडे ग्रामस्थ मंडळ प्रमुख असणारे पोलीस पाटील नंदकुमार माया म्हात्रे व त्यांचे १७ ग्रामस्थ सहकारी हे दरवर्षी धार्मिक व इतर सामाजिक कार्याच्या नावाने लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करतात. त्यांची कोणतीही नोंद न ठेवता ग्रामस्थांची फसवणूक करतात. याविरोधात आवाज उठवला म्हणून गेल्या आठ वर्षांपूर्वीपासून वाळीत टाकल्याची तक्रार जनार्दन शिवराम नाईक यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. वाळीत टाकल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी करून घेण्यास मज्जाव केला.