शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पंचरंगी सामना

By admin | Updated: September 28, 2014 02:50 IST

आता अर्ज भरल्यानंतर मुंबईतील मतदारसंघांचे चित्र पाहिले तर जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करण्याची संधी दवडली नाही. शेकडो कार्यकत्र्यांसह वाजतगाजत उमेदवार निवडणूक कार्यालयाच्या दिशेने जात होते. आता अर्ज भरल्यानंतर मुंबईतील मतदारसंघांचे चित्र पाहिले तर जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
 
भांडुप (प़)
भांडुप या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस 
व मनसेत खरी लढत होईल. येथून सेनेने नगरसेवक अशोक पाटील, भाजपाने नगरसेवक मनोज कोटक, काँग्रेसने श्याम सावंत, राष्ट्रवादीने 
एल. बी. सिंग, मनसेने 
आ. शिशिर शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. 
 
शिवसेनेच्या किल्ल्यात 
काँग्रेस-मनसेत हातघाई
मराठी, त्यातही कोकणी मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेकडून नगरसेवक रमेश कोरगावकर तर भाजपाकडून तालुकाध्यक्ष जितेंद्र घाडीगावकर इच्छुक होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, मतदारांनाही हीच दोन नावे अपेक्षित होती. मात्र आयत्यावेळी त्यांना डावलण्यात आल्याने दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भांडुपशी काडीमात्र संबंध नसलेल्या अमराठी कोटक यांना भांडुपकर घाम फोडू शकतील. याच नाराजीचा फटका पाटील यांनाही बसेल. या नव्या घडामोडींमुळे मनसेचे इंजिन वेग घेईल. काँग्रेसचे सावंत हे तळकोकणातले आणि भांडुपमधले बुजुर्ग राजकारणी असल्याने त्यांनाही या समीकरणाचा फायदा होऊ शकेल.
 
विक्रोळी 
विक्रोळी एकेकाळच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर कब्जा करणा:या मनसेचे इंजिन रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असले, तरी येथील खरी लढत ही मनसे आणि राष्ट्रवादीत असेल. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेत होणार खरी लढत
मनसेचे विद्यमान आमदार मंगेश सांगळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील, शिवसेनेकडून सुनील राऊत, काँग्रेसकडून संदेश म्हात्रे रिंगणात आहेत. भाजपाने ही जागा रिपाइंसाठी सोडली आहे. यापैकी शिवसेनेचे राऊत विक्रोळीकरांना नवखे आहेत. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शिवसेना पदाधिका:यांचे सहकार्य राऊत यांना कसे मिळते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. काँग्रेसचा येथे पाया नसल्याने म्हात्रेंना स्वबळावर लढावे लागेल. पाटील यांना या मतदारसंघातून अंतर्गत विरोधही आहे. भाषिक समीकरण आणि आमदार निधीतून 
केलेली कामे सांगळेंची जमेची बाजू ठरू शकेल. 
 
वर्सोवा
काँग्रेसचे प्रभुत्व असलेल्या वर्सोवा मतदारसंघाला तडा जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार आमदार बलदेव 
खोसा यांच्यासमोर शिवसेनेच्या राजूल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा यांचे कडवे आव्हान आहे. 
 
नाराजी, मतविभाजनाचा मुद्दा ठरणार निर्णायक
कोळी समाजाला उमेदवारी न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. मनसेला मात्र येथे जनाधार नाही. भाजपाने ही जागा भारती लव्हेकर यांना दिल्याने भाजपा कार्यकत्र्यामध्ये नाराजी आहे. लढत पंचरंगी असली तरीदेखील मुख्य लढत ही काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात आहे. 
विकासाची कामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. नरेंद्र वर्मा यांचा मतदारसंघातील जनसंपर्क चांगला आहे. राजूल पटेल यांच्याकडे गुजराती समाजाची मतेदेखील वळू शकतात. त्यामुळे मतविभागणी कशी होणार, यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून 
आहे. 
 
अणुशक्तीनगर 
सेनेकडून पुन्हा 
एकदा तुकाराम काते आणि भाजपाकडून विठ्ठल खरटमल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता या विभागात मुख्य लढत ही राष्ट्रवादी, सेना व भाजपामध्ये होणार आहे. येथे काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आमदार आहेत.
 
जाती-धर्माची समीकरणो महत्त्वाची ठरणार
या भागातील माजी नगरसेवक विठ्ठल खरटमल हे आमदारकी मिळवण्यासाठी आतूर आहेत. तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे मतांचे विभाजन कसे होणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार, हे गणित महत्त्वाचे ठरले. याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे अकबर हुसेन (राजू बटला) यांनी देखील अर्ज भरलेला आहे. तर मनसेकडून आधी नवीन आचार्य यांचे नाव पुढे होते. मात्र या ठिकाणी वीणा उकरंडे यांना संधी मिळाली आहे. या विभागात मुस्लीम, दलित, सिंधी, कोळी, आग्री अशा प्रकारे सर्वच जातीधर्माचे मतदार आहेत. येथे प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असल्यामुळे पाण्याचे राजकारण सर्वपक्षांकडून केले जाते.
 
घाटकोपर पश्चिम 
भांडुप मतदारसंघाप्रमाणोच 
हाही मतदारसंघ मराठमोळा आहे. निवडणुकीआधी मनसेतून भाजपामध्ये आलेल्या राम कदम यांच्याविरोधात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी इथली प्रमुख लढत असेल. 
 
प्रचारात विकासाचा  
मुद्दा सर्वच जण वापरणार
मनसेतर्फे विभाग अध्यक्ष दिलीप लांडे, शिवसेनेतर्फे विभागप्रमुख सुधीर मोरे, राष्ट्रवादीचे राजू घुगे रिंगणात आहेत. कदम, लांडे आणि मोरे यांच्यात इथली मराठी मते विभागली जातील. मात्र येथील बहुतांश कोकणी मतदार मोरेंच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची तीसेक हजार पारंपरिक मते आहेत. लोकसभा लढतीवेळी निर्माण झालेल्या मोदी लाटेतही ही मते आघाडीसोबत होती. मात्र आघाडी फुटल्याने या मतांचेही विभाजन होईल. गेल्या पाच वर्षामध्ये घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा विकास याच मुद्दय़ावर शिवसेना, मनसे प्रचार करेल. 
 
मागाठाणो
आघाडी व महायुती यांच्यात ताटातूट झालेली असली तरी याचा फारसा 
परिणाम मागठाणो मतदारसंघात जाणवणार नाही. मागाठाणो विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व 
आहे. 
 
मनसे विरुद्ध शिवसेना सामना रंगणार
मनसेतर्फे यंदाही प्रवीण दरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांच्याशी त्यांची टक्कर होणार आहे. भाजपाकडून हेमंतराव मेहता आव्हान देत आहेत. कॉँग्रेसकडून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीकडूनसचिन शिंदे निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. मागाठाणो विधानसभा मतदारसंघात मराठी व गुजराती भाषिक वर्गाचा भरणा आहे. 2क्क्9 साली मागाठाणो मतदारसंघातून मनसेच्या प्रवीण दरेकर यांनी 13 हजार मतांनी विजय मिळवून प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता. यंदाही ही लढत अटीतटीची होणार असल्याचेच चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे.
 
मुलुंड 
मुलुंड भाजपाचा अभेद्य गड मानला जातो. युती-आघाडी तुटल्यानंतर हा गड राखण्याचे आव्हान  भाजपाचे उमेदवार सरदार तारासिंग यांच्यासमोर आहे. गुजराती-मराठी मतदारांचे प्राबल्य असूनही तारासिंग सातत्याने निवडून आले.
 
भाजपासमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
यंदा त्यांच्यासमोर शिवसेनेकडून प्रभाकर शिंदे स्वतंत्रपणो उभे ठाकणार आहेत. राष्ट्रवादीचे नंदकुमार वैतीही रिंगणात आहेत. काँग्रेसने माजी विधान परिषद सदस्य चरणसिंग सप्रा यांना उमेदवारी दिली आहे. मनसेकडून सत्यवान दळवी नशीब आजमावणार आहेत.  मुलुंड पश्चिमेकडे गुजराती तर पूर्वेकडे मराठी मतदार बहुसंख्य आहेत. शिवसेना, मनसे आणि काही अंशी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. तर सप्रा यांनी कामांमधून येथे निर्माण केलेला जनाधार, भाजपाच्या युवा पदाधिका:यांकडून असलेला अंतर्गत विरोध यातून तारासिंग विजयी घोडदौड कायम ठेवू शकतात का, याबाबत उत्सुकता आहे.
 
कांदिवली पूर्व 
कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. कॉँग्रेसचे रमेशसिंग ठाकूर यांचा ठसा नगरसेवक व आमदार म्हणून गेली अनेक वर्षे आहे. तर राष्ट्रवादीकडून श्रीकांत मिश्र यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 
 
कांदिवली काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत?
या मतदारसंघातून शिवसेनेतून गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर मैदानात आहेत. भाजपाचे अतुल भातखळकरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेचे अॅड. अखिलेश चौबेंचेही आव्हान ठाकूर यांच्यासमोर आहे. येथे उत्तर भारतीयांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात उतरवल्याचे स्पष्टच आहे. यात शिवसेना आणि भाजपाचे दोनच मराठी उमेदवार असल्याने या तुटलेल्या युतीचे पारडे कितपत वर जाईल, हे पाहणो महत्त्वाचे ठरेल. 2क्क्9 साली या मतदारसंघातून भाजपाच्या जयप्रकाश ठाकूर यांचा 11 हजार मतांनी पराभव करून कॉँग्रेसच्या रमेशसिंग ठाकूर यांनी विजय मिळविला होता.
 
मानखुर्द-शिवाजीनगर
मतदारसंघाबाहेरच्या उमेदवाराला हात देणा:या शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये मुस्लीम, उत्तर भारतीय मतांचे प्राबल्य आहे. भाजपाने हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या जागेवर रिपाइं काय करिश्मा दाखवते ते पाहावे लागेल.
 
मुस्लीम, उत्तर भारतीय मतांसाठी रस्सीखेच
काँग्रेस-समाजवादी पार्टी ही नवी आघाडी तुटल्याने हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणो लढतील. काँग्रेसने येथून पुन्हा एकदा माजी आमदार युसूफ अब्राहनी यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षातर्फे अबू आझमीही रिंगणात आहेत. या दोघांना शिवसनेच्या बुलेट पाटील यांचे कडवे आव्हान असेल. मनसेने येथून सय्यद सोहेल अo्रफ यांना, शेतकरी कामगार पक्षाने रणजित वर्मा तर राष्ट्रवादीने राजेंद्र वाघमारे यांना रिंगणात उतरविले आहे. येथील अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीय मतांची काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आणि शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर विभागणी होणार आहे. त्यामुळे इथली लढत अत्यंत चुरशीची होऊ शकेल. 
 
 वरळी 
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला 35 हजारांची पिछाडी होती.  मात्र आता परिस्थिती विपरीत झाल्याने विरोधकांतील मतविभागणीचा फायदा मिळण्याच्या शक्यतेने त्यांचे मनोधैर्य वाढले 
आहे. 
 
मातब्बरांमध्ये पंचरंगी लढत होणार !
महायुती व कॉँग्रेस आघाडीच्या घटस्फोटामुळे वरळी मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पंचरंगी लढत अपेक्षित आहे. विद्यमान आ. सचिन अहीर यांच्या पारडय़ातून कॉँग्रेसच्या मताची वजाबाकी होणार आहे. तरी विरोधातील मते सेना, भाजपा व मनसेमध्ये विभागली जाणार असल्याने त्यांना समान संधी निर्माण झाली आहे. त्याची लढत प्रामुख्याने शिवसेनेच्या सुनील शिंदेंशी होणार असल्याची सध्याची स्थिती आहे. दोघांनी आज उमेदवारी अर्ज भरून अधिकृतपणो प्रचार सुरू केला आहे. या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय कॉँग्रेसची उमेदवारी दत्ता नवगरे यांना तर भाजपातर्फे  सुनील राणो रिंगणात आहेत. मनसेने या वेळी विजय कुडतकर यांना उमेदवारी दिली.
 
 मलबार हिल
लोढांना पक्षांतर्गत संघर्षाबरोबर आता सेनेच्या उघड विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसने अॅड. सुशीबेन शहा या गुजराती समाजातील महिलेला संधी दिल्याने लोढांना दुहेरी संकटास सामोरे जावे लागणार 
आहे. 
 
शिवसेना लोढांचा वचपा काढण्यासाठी एकवटली
दक्षिण मुंबईतील भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणा:या मलबार हिल मतदारसंघ युती दुभंगल्यामुळे अडचणीत आला आहे. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने  नाराज झालेल्या आ. मंगलप्रभात लोढा यांनी सेनेच्या उमेदवाराला साथ दिली नव्हती. त्यामुळे  त्याचा वचपा विधानसभेत काढण्यासाठी शिवसेनेकडून ही लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. बेस्टचे अध्यक्ष अरुण दूधवडकर यांना उमेदवारी दिली असून लोढांची या वेळी गुर्मी उतरवायचीच, असा चंग सेना नेतृत्वासह खा. अरविंद सावंत यांनी बांधला आहे. त्यामुळे अन्य 5 मतदारसंघांपेक्षा या ठिकाणच्या प्रचारावर जास्त भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
जोगेश्वरी पूर्व
जोगेश्वरी पूव्रेत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने येथे रवींद्र वायकर 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल़े स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने निधी पश्चिम उपनगराकडे वळवून त्यांनी आपले स्थान भक्कम केल़े
 
मित्रपक्षाकडूनच शिवसेनेला आव्हान
याच मतदारसंघातून भाजपाने सुधार समितीच्या विद्यमान अध्यक्ष उज्‍जवला मोडक यांना उमेदवारी देऊन वायकर यांना आव्हान दिले आह़े मोडक या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांचा जनसंपर्कही दांडगा आह़े त्यातच मनसेनेही येथे विद्यमान नगरसेवक भालचंद्र आंबुरे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपातून आलेले राजेश शर्मा यांना काँग्रेसने मैदानात उतरविले आह़े राष्ट्रवादीच्यावतीने दिनकर तावडे येथे निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर बहुजन समाज पार्टीने अनिमुल्ला खान यांना उभे केले आह़े यातील बहुतेक उमेदवार स्थानिक असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची व अटीतटीची होणार आह़े
 
वडाळा 
गेली 25 वर्षे वडाळा किल्ला राखून ठेवण्यात यशस्वी ठरलेले विद्यमान आ. कालिदास कोळंबकर यांना यंदाही फायदा होण्याची चिन्हे आहेत़ कारण त्यांना मात देईल असा एकही उमेदवार कोणत्याही पक्षाने या विभागात दिलेला नाही़ 
 
मत विभाजनाचा फायदा काँग्रेसला होणार   ?
राष्ट्रवादी पक्षाकडून प्रमोद पाटील यांना उमेदवारी मिळाली आह़े मात्र 2क्क्9 च्या निवडणुकीत पाटील यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती़ त्यावेळी पाटील यांना कोळंबकर यांना शह देता आला नाही़ युती तुटल्याने येथे शिवसेनेकडून हेमंत डोके यांना उमेदवारी मिळाली आह़े भाजपाकडून मिहीर चंद्रकांत पोटेचा यांना उमेदवारी मिळाली आह़े तसेच रिपाइं आठवले गटाकडून गौतम गोविंद गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांचे खंदे समर्थक हे मोठय़ा प्रमाणात आहेत़ तर मनसेकडून आनंद प्रभू यांना उमेदवारी मिळाली आह़े याने मराठी मते पुन्हा दुभंगली जाणार असून, याचा फायदा काँग्रेला होण्याची शक्यता आह़े 
 
अंधेरी पूर्व
राष्ट्रवादीकडून अकीलेश यांनी उमेदवारी मिळाली आह़े काँग्रेसने वेगळी चुल मांडल्याने  राष्ट्रवादीचे येथील कार्यकत्र्यानी चांगलीच तयारी सुरू केली आह़े  त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आह़े  
 
अंधेरी पूर्वमध्ये 
चुरशीची लढत
अंधेरी पूर्वमध्ये विद्यमान आमदार सुरेश शेट्टी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आह़े विकास कामांच्या मुद्दयांवर आमदार शेट्टी यांनी प्रचार सुरू केला आह़े तसेच भाजपकडून अमित साटम हे देखील रिंगणात उतरले आहेत़ त्यांनी अंधेरी पूर्वची दुरावस्था झाल्याचा दावा  साटम यांनी केला आह़े  दुसरीकडे मनसेकडून संदीप दळवी यांनीही तयारी सुरू केली आह़े त्यांनीही मराठीचा मुद्दा उचलून धरला आह़े  राष्ट्रवादीकडून अकीलेश यांनी उमेदवारी मिळाली आह़े काँग्रेसने वेगळी चुल मांडल्याने  राष्ट्रवादीचे येथील कार्यकत्र्यानी चांगलीच तयारी सुरू केली आह़े  त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आह़े  
 
अंधेरी पश्चिम
कोशळकर समर्थकांसह राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्तेही नाराज आहेत़ तर सेनेकडून परब यांना उमेदवारी मिळाल्याने सुनील दळवी समर्थकही नाराजच आह़े तसेच लष्करीया यांच्या उमेदवारीलाही पक्षाअंतर्गत विरोधच होता़ 
 
प्रत्येक पक्षात 
नाराजीचा सूर
अंधेरी पश्चिममध्ये उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच इच्छुकांमध्ये 
चढोओढ सुरू होती़ त्यात आघाडी व 
युती तुटल्यानंतर तेथे संम्रभमाचे वातावरण झाल़े मात्र आता विद्यमान आमदार अशोक जाधव, राष्ट्रवादीकडून अल्पना पेंटर, मनसेकडून रईस लष्करीया, शिवसेनेकडून जयवंत परब, भाजपकडून सुनील यादव यांना उमेदवारी जाहीर झाली आह़े या सर्व पक्षांकडून अनेकजण इच्छुक होत़े इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने येथे प्रत्येक पक्षात नाराजीचा सुर आह़े  महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे येथील जिल्हाध्यक्ष बाबण्णा कोशाळकर हे गेली पंधरा वर्षे पक्षाचे काम करत आह़े
 
चेंबूर
आता या विभागात भाजपाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत, तर भाजपाकडून अनिल चौहान यांनी अर्ज भरला आहे. मात्र भाजपाकडून त्यांना अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. बसपातर्फे सोनटक्के यांनी अर्ज भरला आहे. 
 
चेंबूरमध्ये हंडोरेंचे 
काय होणार? 
आघाडी एकत्र असताना या विभागातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हेच निवडणुकीच्या रिंगणात असायचे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या भागात पवार यांचे काम आहे. याच विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक निकाळजे हे मैदानात आहेत तसेच या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकरही उभे राहणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजा चौघुले यांच्या नावाची चर्चा होती, मात्र येथून सारिका सावंत - सदानी यांनी अर्ज भरला आहे. या मतदारसंघात 199क् पासून 2क्क्3 र्पयत भाजपाचे आमदार होते.