शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांचे हाल, चार तासांनंतर हार्बर डाऊन मार्गावर धावली लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:14 IST

मुंबई/ पनवेल : सलग पाचव्या दिवशीही हार्बर प्रवाशांचे लेटमार्कचे विघ्न दूर झाले नाही. सोमवारी दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची आशा फोल ठरली.

मुंबई/ पनवेल : सलग पाचव्या दिवशीही हार्बर प्रवाशांचे लेटमार्कचे विघ्न दूर झाले नाही. सोमवारी दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची आशा फोल ठरली. मंगळवारी सकाळी ‘पिक अव्हर’मध्ये बेलापूर स्थानकाजवळ लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. या बिघाडानंतर तब्बल चार तासांनी हार्बर डाऊन मार्गावर लोकल धावली. तर सायंकाळी ६च्या सुमारास रे रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे अप दिशेला लोकलच्या रांगा लागल्याचे दिसून आले.बेलापूर स्थानकाजवळ सकाळी ९.४० मिनिटांनी डाऊन दिशेला जाणाºया लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे पेंटाग्राफचे नुकसान झाले. तसेच ओव्हरहेड वायरदेखील तुटली. यामुळे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान ९.४० ते ९.५५ वाजेपर्यंत अप मार्गावरील लोकलवरदेखील याचा परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कुर्ला स्थानकातून सकाळी १०.३० मिनिटांनी दुरुस्ती करणारी ‘टॉवर वॅगन’ बेलापूर दिशेला रवाना झाली. सकाळी ९.५५ वाजता अप मार्ग सुरू करण्यात आला तर दुपारी १.०२ मिनिटांनी बिघाड दुरुस्त करून डाऊन लोकल सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे सुट्ट्यांमुळे प्रथम कामासाठी बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचा मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला.तथापि, बिघाड दुरुस्ती झाल्यावरही रेल्वे गाड्या पुढे सरकल्या नव्हत्या. प्रत्यक्ष लोकल फेºया सुरळीत होण्यास विलंब झाला. हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हळूहळू लोकल फेºया वेळापत्रकानुसार चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. मात्र सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘रे रोड’ स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुन्हा हार्बर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.>आजपासून ४८ तासांचा रात्रकालीन ब्लॉकहार्बर मार्गावर बेलापूर स्थानकात २७-२८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २७ डिसेंबरच्या (बुधवार-गुरुवार) मध्यरात्री २ वाजेपासून ते २८ डिसेंबर (गुरुवार-शुक्रवार) मध्यरात्री २ वाजेपर्यंत ४८ तासांचा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या दोन्ही दिवशी प्रत्येकी ३४ फेºया रद्द केल्या आहेत. यात पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फेºयांचा समावेश आहे. ब्लॉकच्या दोन्ही दिवसांत या फेºया रद्द आहेत. ट्रान्सहार्बर वेळापत्रकानुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फेºया पूर्णत: आणि १६ लोकल फेºया अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. २२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा तासभर लांबला. परिणामी, काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात क्रॉस ओव्हरमध्ये ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करण्यात आली होती. याचा फटका बसल्यामुळे बेलापूर स्थानकाजवळ पेंटाग्राफचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.>मध्य रेल्वेचा विरोधाभास असाही...मंगळवारी सकाळपासून हार्बर रेल्वेमार्ग विस्कळीत झाला होता. मात्र या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात जपानचे वाहतूकमंत्री आणि त्यांचे पथक भेटीसाठी आले होते. या वेळी महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्या समवेत मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीत ‘मुंबई उपनगरीय लोकल’ या विषयावर दृकश्राव्य पद्धतीने (पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन) सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर जपानी पथकाकडून मध्य रेल्वे प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. त्यामुळे अधिकाºयांना ‘हासू’ आणि प्रवाशांना ‘आसू’ असे विरोधाभासाचे चित्र मंगळवारी होते.>लोकलच्या धडकेत परभणीच्या महिलेचा मृत्यूडोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बदलापूर लोकलखाली सीताबाई सोळंकी (वय अंदाजे ४५, रा. जिल्हा परभणी) यांचा मृत्यू झाल्याची घटना, मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर घडली. या वेळी त्यांच्या समवेत मुलगी व दीर होते, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी दिली. अपघातानंतर लोकलखालून सीताबाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यास काहीसा वेळ गेला. त्यामुळे रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत विस्कळीत झाले. विशेषत: धिम्या मार्गावरील डाउन दिशेकडील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या.>रस्ते वाहतुकीवर ताणबेलापूर रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणाºया रेल्वेतून धूर निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. १०.१५ वाजता मुंबईकडे जाणारी सेवा बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे वाहतुकीचा ताण रस्त्यावरील वाहनांवर पडला. खासगी वाहने, बस, रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची चढाओढ झाल्याचे पाहावयास मिळाले. पनवेल, कळंबोली, खारघर या ठिकाणच्या बस स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहावयास मिळाली. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामासाठी बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचा मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला.