शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चार विवाह केल्यानंतर पाचवीचीही फसवणूक

By admin | Updated: May 31, 2017 03:45 IST

आधी चार विवाह केलेले असतानाही स्वत:चा फ्लॅट आणि करोडोंची गुंतवणूक असल्याचे सांगून संजय वर्मा याने पाचवे लग्न केले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी चार विवाह केलेले असतानाही स्वत:चा फ्लॅट आणि करोडोंची गुंतवणूक असल्याचे सांगून संजय वर्मा याने पाचवे लग्न केले. पाचव्या पत्नीलाही दहा लाखांना गंडा घालून आणि मारहाण करून ठार मारण्याची त्याने धमकी दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मुंबईच्या गोरेगाव येथील अलंकार सोसायटीतील रहिवासी असलेला संजय (३८) याने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा वापर करून ठाण्यातील ३७ वर्षीय महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिच्याशी संपर्क साधून पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला असून एक मुलगाही असल्याचे त्याने सांगितले. स्वत:चा फ्लॅट, करोडो रुपयांची गुंतवणूक आणि चांगल्या ठिकाणी नोकरीही असल्याची त्याने बतावणी केली. त्यातूनच ओळख वाढवून तिला लग्न करण्यास भाग पाडले. तिच्याकडून त्याने लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत वेगवेगळ्या बहाण्याने दहा लाख रुपये घेतले. दरम्यान, त्याने अन्य दोन महिलांशीही लग्न करून त्यांना घटस्फोट न देता आपल्याशी विवाह केल्याचे तिच्या लक्षात आले. याचा तिने जाब विचारल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक छळ करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्याने अन्यही काही महिलांना लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कारणाने पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक करून पुन्हा जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर नाव नोंदविले आहे. तो आणखीही काही महिलांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. याप्रकरणी २९ मे रोजी या महिलेने त्याच्याविरुद्ध फसवणूक, हुंड्यासाठी छळ, धमकी देणे, मारहाण करणे अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.