शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो हाऊसच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर अखेर नियंत्रण

By admin | Updated: June 2, 2016 21:55 IST

दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपगृहानजीक चार मजली मेट्रो हाऊसमध्ये आज संध्याकाळी अचानक आगीचा भडका उडाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2-   दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपगृहानजीक चार मजली मेट्रो हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलानं अखेर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या इमारतीत कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. जवळपास 6 तासांहून अधिक काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नौदल आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. जुनी इमारत व लाकडी फर्निचर असलेल्या या इमारतीमध्ये आगीने अचानक पेट घेतला होता. त्याचत छतावरील डांबरामुळे ही आग पसरून आसपासच्या इमारतीलाही वेढले होते. मदतकार्यादरम्यान पाणीच संपल्यामुळे नौदल व खासगी टँकरची मदत घेण्यात आली. 
मेट्रो हाऊस या जुन्या इमारतीमध्ये चारच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील व्हीन्स गेस्ट हाऊसमध्ये स्पार्क उडाला. यामुळे वातानुकूल यंत्राने पेट घेतला. त्यातच शॉटसर्किट आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे आग वाढून वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. या इमारतमध्ये प्रसिद्ध कॅफे मॉन्डीगेर आणि मॅकडोन्लडचे दुकान आहेत. मात्र येथे खेटून असलेल्या इमारती, चिंचोळे रस्ते आणि लाकडी जिने, फर्निचरमुळे आग वाढतच गेली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगीचे १८ बंब आणि पाण्याचे ११ टँकर घटनास्थळी होते. तसेच चार रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या. मात्र खबरदारी म्हणून आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. आग लागलेल्या इमारतीमधील दोन महिलांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 
 
- चौकशीची मागणी
 
महापौर स्नेहल आंबेकर आणि आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळाची रात्री पाहणी केली. स्थानिक खासदार अरविंद सावंत हेदेखील घटनास्थळी होते. त्यांनी या आगीच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे.