धामणगाव (रेल्वे)(जि़ अमरावती) : पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील दीडशे पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधन वाढीसंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गेल्या महिन्यात गृहमंत्री आऱआऱ पाटील यांनी दिले होते.पोलीस पाटलांसाठी ही खूशखबर असली तरी अनेक मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, यासाठी १६ आॅगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे पोलीस पाटलांचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे़ पोलीस पाटलांंवर होणारे हल्ले रोखण्यासंदर्भात तसेच इतर अनेक बाबींवर या अधिवेशनात चिंतन करण्यात येईल, अशी माहिती पोलीस पाटील असोसिएशनचे राज्य संघटन सचिव गणेश हटवार यांनी दिली़ आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांवर होणारे प्राणघातक हल्ले यावर या अधिवेशनात चिंतन केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)
पाच वर्षांत दीडशे पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले
By admin | Updated: August 16, 2014 02:17 IST