शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मैदानावरील तास, देणार १० गुण!

By admin | Updated: June 20, 2016 03:53 IST

प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर खेळण्यासाठी किमान १ तास दिला, तर त्या मुलाला शाळेत १० गुण देण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

मुंबई : प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर खेळण्यासाठी किमान १ तास दिला, तर त्या मुलाला शाळेत १० गुण देण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. दादर, शिवाजी पार्क येथील ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलेल्या ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे उद्घाटन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी समर्थच्या मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांनंतर तावडे म्हणाले की, ‘प्रत्येक विद्यार्थी किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित असल्यास, त्याला शाळेत १० गुण अतिरिक्त द्यायला हवेत, तसेच विविध खेळांमधील चांगल्या खेळाडूंसाठी मोठ्या संख्येने चांगल्या नोकऱ्याही निर्माण झाल्या पाहिजेत व मी स्वत: प्रयत्न करेन,’ असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.‘मैदानावर सराव केला, तरच खेळाडू तयार होतील, शिवाय मुले मोबाइल व टीव्हीपासून आपसूकच दूर होतील. खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्याची खेळात नक्कीच चांगली प्रगती होते. खेळाडंूना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे आश्वासन तावडे यांनी या वेळी दिले.मल्लखांबातील पहिले छत्रपती पुरस्कार विजेते व सध्या मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्यवाह दत्ताराम दुदम हेदेखील समारंभाला उपस्थित होते. या शिबिरात ३२५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. करंजगाव, तसेच कोठुरे, निफाड, नाशिक येथील १२ तर कलाकार ट्रस्ट, दिल्ली या संस्थेतील २ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षकांचा सत्कार समर्थचे ज्येष्ठ आजीव सभासद व ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे आणि त्यांच्या पत्नी आशाताई देखणे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील कार्यरत असलेल्या देखणेसरांनी, समर्थचे संस्थापक व्यायाम महर्षी प्र. ल. काळेगुरुजी यांनी दिलेल्या व्यायामाच्या बाळकडूला सर्व श्रेय दिले.