शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवामुळे काजव्यांच्या प्रजनन काळास धोका नको, निर्बंध घाला; हरित न्यायाधिकरणाचे आदेश 

By संदीप आडनाईक | Updated: July 15, 2025 16:46 IST

वन आणि पर्यटन विभागास नियमावलीच्या सूचना

संदीप आडनाईककोल्हापूर : काजव्यांचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही, यासाठी वन विभागाने निर्बंध घालावेत, असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या खंडपीठाने वन विभागास दिले आहेत.राज्यात दाजीपूर-राधानगरी, महाबळेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, राजमाची, पुरुषवाडी, प्रभावळवाडी, भीमाशंकर आणि माळशेज घाट येथील अभयारण्यात मेअखेरीस काजवा महोत्सव भरवतात.

महसूल मिळवण्यासाठी पर्यटन विभाग वन विभागासोबत हा महोत्सव आयोजित करतो. यासाठी अधिकृत स्वतंत्र नियमावली नाही, ती करावी आणि पर्यटकांवर कठोर निर्बंध घालावेत, यासाठी पर्यावरणप्रेमी गणेश बोहाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतली होती. या याचिकेवर (दिशा) न्यायाधिकरणासमोर २० जूनला अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याबाबत वन आणि पर्यटन विभागाला या महोत्सवासाठी नियम, निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. खंडपीठाने दोन्ही प्रतिवादींकडून सादर केलेल्या शपथपत्रांचे निरीक्षण करत हा अर्ज निकाली काढला.

अशी असेल नियमावली

  • रात्री ९:०० नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश बंद.
  • अभयारण्यात दर्शनी भागात प्रबोधनपर फलक लावणे.
  • महोत्सव दरवर्षी न घेता एक वर्षाआड घ्यावेत.
  • प्रत्येक पर्यटकाची नोंद करावी.
  • तीन वर्षांसाठी निरीक्षक समिती नियुक्त करावी.

जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेले राज्यातील संरक्षित अभयारण्यासारखे परिसर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षित इको सेन्सिटिव्ह झोन आहेत. काजवे पाहण्याच्या निमित्ताने जैवविविधतेला हानिकारक पर्यटकांच्या वर्तणुकीला यामुळे आळा बसेल. - गणेश बोऱ्हाडे, संगमनेर, पर्यावरणप्रेमी याचिकाकर्ते.